एक्स्प्लोर
तूर पेरायला लावून फसवणूक, मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार अर्ज

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पैठणच्या पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तूर पेरायला लावून सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तूर पेरायला लावून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेने केला आहे. त्यानुसार पैठण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने केली आहे. पोलिसांनी अन्नदाता शेतकरी संघटनेचा अर्ज स्वीकारला आहे. दरम्यान, नाफेडने 22 एप्रिलनंतर तूर खरेदी थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाखो क्विंटल तूर सध्या पडून आहे. मुख्यमंत्र्यांनीही तूर खरेदीबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल होती. त्यामुळे 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी रामविलास पासवान यांच्याकडे केली. 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांना टोकण मिळालेले आहेत, त्यांची तूर खरेदी केली जाईल. मात्र ज्यांच्याकडे टोकण नाहीत, त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच तूर विकावी लागणार आहे. संबंधित बातम्या : ''22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार'' सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करु, मुख्यमंत्र्यांचं शिवसेना मंत्र्यांना आश्वासन
आणखी वाचा























