एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Commonwealth Day च्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीचा रणजितसिंह डिसले यांच्याशी विशेष संवाद
आज राष्ट्रकूल देशांमध्ये Commonwealth Day साजरा केला जातोय. त्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीने ग्लोबल टीचर्स अवार्ड जिंकणाऱ्या रणजितसिंह डिसले यांच्याशी विशेष संवाद साधला आहे.
लंडन : राष्ट्रकूल देशांमध्ये आज Commonwealth Day साजरा केला जातोय. त्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीने राष्ट्रकूल देशांतील बालकांच्या शिक्षणासंबंधी ग्लोबल टीचर्स अवार्ड जिंकणाऱ्या रणजितसिंह डिसले यांच्याशी खास संवाद साधलाय. बीबीसीने घेतलेल्या एका मुलाखतीत जगभरातील बालकांच्या शिक्षणावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये भाग घेण्याची संधी रणजितसिंह डिसले यांना मिळाली.
इंग्लंडच्या राणी बालकांच्या शिक्षणावरील कार्यक्रमावर नेहमी अग्रेसर असतात. त्यावर चर्चा करताना त्या म्हणाल्या की, मला नेहमीच पुस्तके वाचण्याची आवड आवड आहे. खूप लहान असल्यापासून वाचणाची आवड निर्माण झाली. त्यामुळे जगभरातील साक्षरता कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला आवडते. प्रत्येक बालकाने शिक्षण घेणं आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा शिक्षणासाठी सकारात्मक वापर करण्यात आला. या काळात अनेक पुस्तके ऑनलाईन वाचली.
बीबीसीने या प्रश्नावर रणजितसिंह डिसले यांचा अनुभव विचारला. त्यावर उत्तर देताना रणजितसिंह डिसले म्हणाले की, "विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक आव्हानावर मात केली आणि किचकट शिक्षणाला आनंदी पद्धतीने शिकवलं. आपल्याकडे अनेक मुली शिक्षणासाठी आल्या. त्या अभ्यासासाठी येत असताना आपल्या लहान भावंडांना घेऊन यायच्या. त्यानंतर मी आजूबाजूच्या खेड्यांतून आणि शहरातून मुलींना शिक्षणासाठी बोलवलं. जर या मुली शिकल्या तर भविष्यातील मुलींना शिक्षण मिळण्याची शाश्वती मिळेल. त्यामुळे आपल्या मुलींना शिक्षण देऊन महिलांचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे.
रणजितसिंह डिसले म्हणाले की, "लॉकडाऊनच्या काळात या मुलींनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतलं. त्यामुळे अनेक नव्या गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. त्यांच्या कल्पनांना नवी वाव मिळाला. मुलांच्या या कल्पनांना कोणतीही सीमा नव्हती. महत्वाचं म्हणजे यामुळे मुलांच्या मनावरचा ताण कमी झाला."
आता राज्यभर 'शाळा' घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, सर्व जिल्ह्यांमध्ये देणार धडे
राणीने जगभरातील बालकांसाठी एक क्विन्स कॉमनवेल्थ एसे कॉम्पिटेशन नावाच्या लिखानाची स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये राष्ट्रकुल देशांतील मुलं भाग घेऊ शकतात आणि त्यामध्ये आपले निबंध सादर करु शकतात. त्यावर राणीने रणजीत डिसले यांना तुमचे विद्यार्थी या स्पर्धमध्ये भाग घेतले तर मला आवडेल असं सांगितलं. त्यावर रणजीत डिसले यांनी आनंद व्यक्त केला आणि आपले विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतील असंही सांगितलं.
आज Commonwealth Day
दरवर्षी प्रत्येक मार्च महिन्याचा दुसरा सोमवार हा राष्ट्रकूल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1958 सालापासून करण्यात आली. पण 1973 साली दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा सोमवार हा राष्ट्रकूल दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरलं. जगभरातील ज्या-ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलं ते देश आज राष्ट्रकूल देशांचे सदस्य आहेत. राष्ट्रकूल देशांच्या संघटनेची सुरवात 1931 साली करण्यात आली असून त्याचे मुख्यालय हे लंडनला आहे. या संघटनेची प्रमुख ही ब्रिटनची राणी असते. भारत या संघटनेचा 1947 साली सदस्य बनला. आज जगभरातील 54 देश हे राष्ट्रकूल संघटनेचा भाग आहेत. 2021 सालच्या Commonwealth Day ची थीम ही 'Delivering a Common Future' अशी आहे.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्काम 7 कोटी रुपये इतकी आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डिसले गुरुजींवर विधानपरिषदेत अभिनंदनाचा वर्षाव; डॉ. नीलम गोऱ्हे म्हणतात..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement