एक्स्प्लोर
नववी आणि अकरावीच्याही आता बोर्ड परीक्षा?
पुणे : राज्यात सध्या दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जात असताना, आता नववी आणि अकरावी या दोन वर्षांसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांनुसार परीक्षा घेण्याचा विचार सरकार दरबारी केला जात आहे. बोर्डाच्या परीक्षेची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला जात असल्याचीही चर्चा सुरु आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव आणला असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. जर हा निर्णय अंमलात आला तर नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
नववी आणि अकरावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. ते प्रमाण बघता उपाययोजना म्हणून शासन दरबारी बोर्डाकडून प्रश्नपत्रिका तयार करुन घेण्यासंर्भातला विचार होत आहे.
प्रत्यक्षात मात्र शैक्षणिक वर्तुळातच या प्रस्तावाला विरोध होणार असल्याची लक्षणं दिसत आहेत. वर्षभराच्या मूल्यमापनाच्या आधारावर नववी आणि अकरावीचे निकाल लागतात. परंतु फक्त वार्षिक परीक्षेसाठीच बोर्डाची प्रश्नपत्रिका का?, शिवाय उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन शाळेनेच करायचं असेल तर हा शासन निर्णय घेण्याने काय फरक पडणार असा ही सवाल उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement