एक्स्प्लोर

मुख्यमंत्री ठाकरेंचा आज जनतेशी संवाद, दिवाळी, अर्णब अटक प्रकरण, मंदिर उघडण्याबाबत काय बोलणार?

आज दुपारी 1.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Live addressing) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दिवाळी, अर्णब गोस्वामी प्रकरण, राज्यातील कोरोनाची स्थिती, बिहार निवडणुकीचे पोल्स या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मुंबई :  आज दुपारी 1.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दसरा मेळाव्यातील भाषणानंतरचा त्यांचा हा थेट संवाद असणार आहे. फेसबुक, ट्विटर लाईव्ह यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आजच्या भाषणात येणारी दिवाळी, अर्णब गोस्वामी प्रकरण, शेतकरी मदत, राज्यातील कोरोनाची स्थिती बिहार निवडणुकीचे पोल्स या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या राज्यभर गाजत असलेला मंदिरं उघडण्याच्या विषयावर ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातली मंदिरं कधी उघडणार असा प्रश्न भाजपा आणि मनसेने वारंवार केला आहे.  इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्याबाबत ते काय भाष्य करतात याकडेही लक्ष लागून आहे. तसेच वाढीव वीजबिलांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं म्हटलं होतं. यावर मुख्यमंत्री काही बोलतील का याकडेही लक्ष लागून आहे. आज राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध उपक्रमांचं लोकार्पण करणार आहेत. दुपारी 3 वाजता ते मीरा भाईंदर येथील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत. तर श्री बाळासाहेब ठाकरे कलादालन, कोविड रुग्णालय आदींचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दुपारी 3.45 वाजता नंदुरबार प्रशासकीय इमारतीचे ऑनलाईन कोनशिला अनावरण करणार आहेत. तर सायंकाळी 4.45 वाजता  कल्याण, टिटवाळा येथील कोविड रुग्णालयांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget