CM Eknath Shinde: 16 लेडीज बार तोडले, माझ्यावर 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ठाण्यातील किस्सा
6 लेडिज बार स्वत: जाऊन तोडले आहे. माझ्यावर आतपर्यंत 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, असं कार्यकर्ता असातानाची आठवण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किस्सा सांगितला.

CM Eknath Shinde: ठाण्यात एकेकाळी लेडीज बारचा सुळसुळाट होता. एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांची मक्तेदारी सुरु होती. ठाण्यात अनेक ठिकाणी पैशांची उधळण सुरु होती. लोकं वेडी झाली होती. पोलिसांना अर्ज करुन दमलो. लोक आम्हाला शिवीगाळ करायचे. आई-बहिणींची इज्जत वाचवू शकत नसेल तर तुमचा उपयोग काय? अशा भाषेत ठाणेकरांनी आमचे कान टोचले होते. 16 लेडिज बार स्वत: जाऊन तोडले आहे. माझ्यावर आतपर्यंत 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, असं कार्यकर्ता असातानाची आठवण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किस्सा सांगितला.
आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना संपणार, अशा चर्चा होत्या. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणेनं आजही ठाण्यात शिवसेनेचा दबदबा कायम आहे. आजही शिवसेना जीवंत आहे. अनेकदा अन्याया विरोधात बंड केला. रात्रंदिवस काम केलं, मेहनत केली त्यामुळे आज इथे उभा आहो. शिवसेनेनं सगळं दिलं त्यामुळे कायमच शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून राहिल, असंही ते म्हणाले.
ठाण्यातील शिवसेना कधीच संपू देणार नाही. शिवसेना टिकवण्यासाठीच शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना व इतर अपक्षांचे 50 आमदार सोबत होते. माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात, असं दिसून येतात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. महाराष्ट्रातील सत्तांतर ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची देशाने नव्हे 33 देशांनी दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्याकडून तीन मोठ्या घोषणा
एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या समारोपावेळी 3 मोठ्या घोषणा केल्या. त्यात हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला. पेट्रोल-डिजेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय नवं सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करणार असल्याचं सांगितलं आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करु, असंही ते म्हणाले























