एक्स्प्लोर
Advertisement
फडणवीस-शाहांची तीन तास चर्चा, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं
या बैठकीत मुख्य मुद्दा होता तो म्हणजे नारायण राणे यांचा.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली.
महत्त्वाचं म्हणजे गुजरातमधील अहमदाबादेत तब्बल तीन तास ही चर्चा सुरु होती, असं सांगण्यात येत आहे. या बैठकीत मुख्य मुद्दा होता तो म्हणजे नारायण राणे यांचा.
नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाबाबत फडणवीस-शाह यांच्यात खल सुरु होता.
मुख्यमंत्री काल अहमदाबादमध्ये होते. त्यावेळी त्यांनी अमित शाहांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.
नारायण राणे यांनी नुकतंच काँग्रेसमधून बाहेर पडून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी एनडीएला साथ दिली.
त्यामुळे राणेंना आता राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यायचं का, दिलं तर त्यांना कोणतं मंत्रिपद द्यायचं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement