एक्स्प्लोर

नागपुरातील शुभम महाकाळकर हत्येचा तपास सीआयडीकडे

नागपूर : नागपुरातील बहुचर्चित शुभम महाकाळकर हत्या प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांवर क्लाऊड सेव्हन बारमध्ये तोडफोड केल्याचा आरोप आहे. 20 नोव्हेंबरच्या रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे आणि त्याच्या मित्रांनी क्लाऊड सेव्हन बारमध्ये तोडफोड केली होती. त्यानंतर बारमालकासोबत झालेल्या भांडणात अभिलाषचा मित्र शुभम महाकाळकर या तरुणाची हत्या झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी आमदार कृष्णा खोपडे यांची दोन्ही मुलं अभिलाष आणि रोहित खोपडे यांच्यासह त्यांच्या मित्रांविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी नागपुरातल्या सर्व भाजप आमदारांनी पोलिसांवर अतिरंजित कारवाईचा आरोप करुन हे प्रकरण नागपूर पोलिसांकडून काढून सीआयडीकडे सोपवण्याची मागणी केली होती. काय आहे प्रकरण? रविवार 20 नोव्हेंबर 2016 च्या रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांची भांडणं झाली. त्या भांडणात अभिलाषनं बारची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यावेळी अभिलाषनं आपला धाकटा भाऊ रोहित खोपडेला आपल्या मदतीसाठी बोलावलं. रोहितसोबत असलेला शुभम महाकाळकरही बारमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा भांडणाला तोंड फुटलं. बारमधल्या कर्मचाऱ्यांनी शुभम आणि अभिलाषच्या गाडीची तोडफोड केली. बारमधून बाहेर पडल्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन अर्धा किलोमीटर अंतरावर लक्ष्मीभुवन परसरात गाठलं. तिथेच शुभम महाकाळकरची भोसकून हत्या केल्याचा आरोप शुभमच्या परिवाराने केला आहे. या भांडणाशी कोणताही संबंध नसलेल्या शुभमला या प्रकरणात जीव गमवावा लागल्यानं नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे. बारमधील तोडफोडी आणि मारामारीनंतर अर्धा किमी अंतरावर झालेल्या शुभम महाकाळकरच्या हत्या प्रकरणात बार मालक सनी बामब्रतवार आणि इतर 7 ते 8 जणांविरोधात हत्येचा (कलम 302) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर क्लाऊड सेव्हन बारच्या सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. बारमध्ये धुडगूस घातल्या प्रकरणी कलम 307 अन्वये अभिलाष खोपडे, रोहित खोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. शुभम महाकाळकर हा राष्ट्रीय पातळीवर लेझिमचा खेळाडू होता. 26 जानेवरीला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनात गेले तीन वर्ष तो सहभागी होत होता.

संबंधित बातम्या :

कृष्णा खोपडेंच्या मुलावरील पोलिसांची अतिरंजित कारवाई : भाजप आमदार

नागपूरचे आमदार कृष्णा खोपडेंच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण

नागपूर : शुभमच्या हत्येप्रकरणी बारमधील 6 कर्मचाऱ्यांना अटक

भाजप आमदारपुत्रांचा बारमालकाशी वाद, तरुणाने जीव गमावला

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget