एक्स्प्लोर
अकोटमधून बांधकाम मजूराच्या मुलीचे अपहरण
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे मनश्री संतोष लाकडे या पाच वर्षीय चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं आहे. काल दुपारी बारा वाजता स्थानिक जिजामाता चौकानजीक असलेल्या सितलामाता मंदिरापासून मनश्रीचे अपहरण करण्यात आलं.
एका महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून मनश्रीचं अपहरण केलं असल्याचं, तिच्यासोबत खेळणाऱ्या मित्रांनी सांगितलं. अकोट पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मनश्रीच्या शोधासाठी पोलिसांनी काल दुपारपासून संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी केली आहे. अनेक ठिकाणी मनश्रीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आली. मात्र, अद्यापही मनश्रीचा शोध लागू शकला नाही.
मनश्रीची घरची परिस्थिती गरिबीची परिस्थिती असल्याने तिचे अपहरण गुप्तधन किंवा इतर कारणांसाठी झालं का?, याचा शोध अकोट पोलीस घेत आहेत. वर्षभरापूर्वी अकोट तालुक्यातील अंबोडा गावात शुभम शिवरकार या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, सदर मुलगी कुणाला आढळल्यास 07258-222642 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन अकोट पोलिसांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement