Uddhav Thackeray in Hospital : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात होणार दाखल
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स रुग्णालयात थोड्याच वेळात दाखल होणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच रुग्णालयात दाखल होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवस मुख्यमंत्री ठाकरे मानेच्या दुखण्यावर उपचार घेणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स हाँस्पिटलमध्ये रुग्णालयात उपचार घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.
आरोग्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांना नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या.
संबंधित बातम्या :
Navab Malik : नवाब मलिकांच्या लढ्याचं 'गुड गोईंग' म्हणत मुख्यंमंत्र्यांनी केलं कौतुक, राज्य मंत्रिमंडळाचा पाठिंबा जाहीर
BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय