BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
BMC Election 2022: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिलीय.
BMC Election 2022: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) तोंडावर महत्वाची माहिती समोर आलीय. मुंबई महानगरपालिकेतील 9 प्रभाग वाढण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. त्यानुसार मुंबई महापालिकेत 217 ऐवजी 236 नगरसेवक असणार आहेत.
मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानंतर आता ही संख्या वाढून 236 इतकी होणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीआधी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात शहरी भागात झपाट्याने लोकसंख्या वाढत असून, त्यामुळे नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, असं राज्य सरकारनें स्पष्ट केलंय.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2001 ते 2011 या दशकात लोकसंख्येत 3.87 टक्के वाढ झालीय. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ आणि वाढते नागरीकरण या गोष्टींचा विचार करून प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपतो आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना एकत्रित लढणार आहेत. तर, कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे.
हे देखील वाचा-
- Uddhav Thackeray in Hospital : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात होणार दाखल
- Navab Malik : नवाब मलिकांच्या लढ्याचं 'गुड गोईंग' म्हणत मुख्यंमंत्र्यांनी केलं कौतुक, राज्य मंत्रिमंडळाचा पाठिंबा जाहीर
- विद्यार्थ्यांना दिलासा, MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय