एक्स्प्लोर
छगन भुजबळ यांची ट्विटरवर एंट्री
छगन भुजबळ यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे.
![छगन भुजबळ यांची ट्विटरवर एंट्री Chhagan bhujbal entry on twitter before his treatment in lilavati hospital छगन भुजबळ यांची ट्विटरवर एंट्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/20131353/chhagan-bhujbal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे.
''माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,'' असं ट्वीट भुजबळांनी केलं आहे.
@ChhaganCBhujbal या नावाने भुजबळांचं ट्विटर हँडल आहे. ट्विटरवर त्यांनी आतापर्यंत कुणालाही फॉलो केलेलं नाही. पुण्यात 10 जूनला भाषण पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत. छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखले जाते. भुजबळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे. भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात होते, त्यामुळे भुजबळांसारखा धडाडीचा नेता पक्षापासून काही काळ दूर होता. आता जामीन मिळाल्याने भुजबळ पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. भुजबळ सुटले! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर आले. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केलं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती. 14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळांना अटक पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च 2016 रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती. संबंधित बातमी छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक? छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार? ‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळेमाझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे pic.twitter.com/UohXzohGOl
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)