जमावबंदी असताना मिरवणूक काढणं पडलं महागात; आठ नगरसेवकांवर गुन्हा दाखल
जमावबंदी असताना मिरवणूक काढणं नगरसेवकांना चांगलचं महागात पडलं आहे. रत्नागिरीत आठ नगरसेवकांसह 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नागिरी : जिल्हात जमावबंदी असताना विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी दापोली नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित आठ सदस्यांसह 150 कर्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सदस्यांनी 19 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान दापोली हर्णे मार्गावर तहसीलदार कार्यालयासमोर मिरवणूक काढली होती. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुहास पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
खालील अब्दुल्ला रखांगे, मेमन आरीफ गफुर, अन्वर अब्दुल गफुर रखांगे, संतोष गंगाराम करकुटके, विलास राजाराम शिगवण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रवींद्र गंगाराम शिरसागर, अजीम महमद चिपळूणकर यांच्यासह सुमारे 150 कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून सर्वांनी घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्त अधिकारी आणि अंमलदार यांनी नियमांचे पालन करण्याबाबत संबंधितांना समजवले. परंतु तरीही त्यांनी मिरवणूक काढली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. शिवाय या कृत्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा संभव आहे, हे माहित असून सामाजिक अंतर न ठेवता विना मास्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 269, 270, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 (01) ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडील आपती व्यवस्थापन कायद्याअन्वये पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत बंदी आहे. त्या अनुषंगाने 19 जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल सीआरपीसी 149 प्रमाणे नियमांचे उल्लंघन करू नये. यासाठी दापोली पोलीस ठाण्यामार्फत दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीतील उभा राहिलेल्या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली होती. परंतु, या नियमांचे उल्लंघन करून ही मिरवणूक काढण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- MLA Son Accident : रुममेटच्या बर्थडेचं सेलिब्रेशन, कडाक्याच्या थंडीत भीषण अपघात, आमदारपुत्राच्या अपघाताची थरारक कहाणी
- Wardha Accident : वर्ध्यात कारचा भीषण अपघात; 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, भाजप आमदार विजय राहांगडालेंच्या मुलाचाही समावेश
- दिल्लीतून चार कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी 'हमास' दहशतवाद्यांनी चोरली, सायबर पोलिसांच्या तपासात उघड
- Budget 2021: बजेटची सुरुवात कशी झाली? त्यात काय-काय बदल झाले? जाणून घ्या बजेटविषयी या 17 रंजक गोष्टी