एक्स्प्लोर

'एक हात मदतीचा' व्हॉट्सअॅप ग्रुपचं कौतुकास्पद काम!

चंद्रपूर: व्हॉट्सअॅप हे कधी कुणाचा घात करेल आणि कधी कुणाच्या उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. केवळ जोक आणि टाईमपासच नव्हे तर व्हॉट्सअॅपवरुन अनेक समाज उपयोगी कामंही केल्याचं आपण पाहिलं आहे. चंद्रपुरातही एका व्हॉट्सअॅप ग्रुपने असंच एक कौतुकास्पद काम केलं आहे. बोन मॅरोशी संबंधित आजारामुळे त्रस्त असलेल्या महिलेला आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम 'एक हात मदतीचा' या व्हॉट्सअॅप ग्रुपने केलं आहे. काय आहे प्रकरण? 30 वर्षाच्या निशा मैती यांना बोन मॅरोचा त्रास आहे.  डॉक्टरांच्या भाषेत aplastic  anaemia  किंवा bone marrow failure असं या आजाराचं नाव सांगण्यात आलं आहे. नाव काहीही असो मात्र या आजारावरील उपचाराचा खर्च तब्बल 14 ते 15 लाख असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुर्दैव म्हणजे निशाच्या सासरी आणि माहेरी अठरा विश्व दारिद्र्य. नवरा प्रमोद चंद्रपुरात हातमजुरी करतो तर भाऊ रवींद्र पाटील होमगार्ड आहे. भावाने हलाखीची परिस्थिती असतानाही बहिणीला उपचारासाठी आपल्या घरी आणले. आतापर्यंत औषध-पाण्यावर 3 लाख खर्च केले, पण कायमचा उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी 14 ते 15 लाखांचा खर्च सांगितला. रवींद्र पाटीलची ही व्यथा कळताच वरोरा शहरातील छावा ग्रुप या संघटनेचे काही तरुण पुढे आले आणि त्यांनी या आजारी बहिणीला मदत करण्याचा संकल्प केला. मोठ्या हिमतीन आजारी बहिणीच्या मदतीचा संकल्प केला तरी या ग्रुप मधल्या सदस्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव होती. त्यामुळेच आपल्या या बहिणीची व्यथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी "एक हात मदतीचा" या नावाने फेसबुक पेज आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाला मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं. विशेष म्हणजे निशाच्या मदतीसाठी या तरुणांनी एक रॅलीदेखील काढली ज्याच्या माध्यमातून 80  हजारांची रक्कम उभी झाली. निशाच्या उपचारावर येणारा खर्च हा फार मोठा आहे आणि त्यामानाने सध्या गोळा झालेली 80 हजारांची रक्कम फार तोकडी आहे. त्यामुळे छावा ग्रुपच्या सदस्यांनी आणखी रक्कम गोळा करण्याचा निर्धार केला आहे.  मात्र या निर्धाराला समाजातील दानशूर व्यक्तींची साथ गरजेची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget