एक्स्प्लोर
लोकांनी हात वर करुन मतदानाची पद्धत आणली तरीही चालेल : चंद्रकांत पाटील
जागावाटपाबाबत सहमती झाली की योग्य वेळी जाहीर करतील. दोन्ही पक्षाचे नेते काय तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. पितृ पक्ष आम्ही मनात नाही. अंधश्रद्धांना आम्ही पाळत नाही, असेही ते म्हणाले.
मुंबई : लोकांनी हात वर करुन मतदान करण्याची पद्धत परत आणली तरीही आम्हाला चालेल. लोक भाजपला भरभरून मतदान करतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी EVM ला दोष देऊ नये. लोकांच्या मनात नरेंद्र आणि देवेंद्र आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी युतीवर बोलताना पाटील म्हणाले की, युतीची सर्वस्वी जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. जागावाटपाबाबत सहमती झाली की योग्य वेळी जाहीर करतील. दोन्ही पक्षाचे नेते काय तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. पितृ पक्ष आम्ही मनात नाही. अंधश्रद्धांना आम्ही पाळत नाही, असेही ते म्हणाले.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शाह हे 370 कलम बाबत व्याख्यान देण्यासाठी आले होते. त्यामुळे युतीसाठी मध्यस्थी करण्याचा त्यांचा प्रश्नच नाही. त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम मुंबईत आहेत. त्यासाठी ते आले आहेत, असेही ते म्हणाले.
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, स्थानिक समस्यांवर आम्ही बोलत नाही तर ते सोडवतो. इतका मोठा दुष्काळ आम्ही सोडवला. विरोधी पक्षांनी आम्हाला प्रश्न समस्या सांगू नयेत. कुठला जीआर, कुठला भ्रष्टाचार हे विरोधकांनी सांगावे. काय भ्रष्टाचार झाला आहे तो काँग्रेस ने समोर आणावा. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आणावे, असेही ते म्हणाले.
सामनातील अग्रलेखांबाबत बोलताना ते म्हणाले की, सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे. सामना आणि शिवसेना हे वेगळे आहेत. संपादकीय कोणाला लिहायचे आहे तो त्यांचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement