एक्स्प्लोर

Maratha Reservation : 'केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारु नये', फेरविचार याचिकेवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये. तर 102 व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये. तर 102 व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

102 व्या घटना दुरुस्ती बाबत केंद्र सरकारच्या फेरविचार याचिकेवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. देशभरातील विविध राज्यांची आरक्षणे आणि राज्यांचे अधिकार वाचवण्यासाठी १०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच 50 टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दाही निकाली निघणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राने या दोन्ही मुद्यांवर केंद्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. राज्य सरकार पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्याची दखल घेत कदाचित केंद्र सरकार 102 व्या घटना दुरुस्तीबाबत 'देर आये दुरुस्त आये' आल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य पावलं उचलावीत, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्रातून विनंती

केंद्र सरकारच्या 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्यांचे अधिकार बाधित होत नाही, हीच भूमिका राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रकरणात मांडली होती. सुरुवातीला विरोधाभासी भूमिका घेतल्यानंतर ॲटर्नी जनरल यांनीही राज्यांचे अधिकार कायम असल्याचे म्हटले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तीन विरुद्ध दोन मतांनी राज्यांना अधिकार नसल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला आव्हान देतानाच इंद्रा साहनी निवाड्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या फेरविचाराचीही विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली पाहिजे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवा मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची शक्यता, सरकारी हालचालींना वेग

कारण मराठा आरक्षण प्रकरणामध्ये बाजू मांडताना देशभरातील सर्वच संबंधित राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. मात्र या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात चकार शब्दही काढला नव्हता. मराठा आरक्षण व इतर आरक्षणांबाबत केंद्र सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी एक तर ही मर्यादा वाढविण्याबाबत घटना दुरुस्ती करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाला फेरविचारासाठी विनंती करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षणRohit Pawar : महायुती काॅपी पेस्ट उमेदवार जाहीर करत आहे - रोहित पवारTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSunil Tingre Pune  : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे दगडूशेठ हलवाई चरणी नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Sanjay Raut : शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला,  मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप
Balasaheb Thorat : 'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
'बाप'नंतर 'दहशत'वरून राजकारण पेटणार, बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले...
महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?
महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडे भारी?
Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
Embed widget