Nawab Malik Arrested : मलिकांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेत्याला पडलं महागात! गुन्हा दाखल
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेत्याला चांगलंच महाग पडलंय.
Nawab Malik Arrested : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक होताना दिसत आहे. भाजप नेते (BJP Mohit Kambhoj) मोहित कंबोज यांना आनंदाच्या भरात तलवार नाचवणं चांगलंच महागात पडलंय. कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मलिकांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेत्याला पडलं महागात!
मलिकांच्या अटकेनंतर काल मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मोहित कंबोज यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कंबोज यांनी तलवारही नाचवली. याप्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तसंच लोकांची गर्दी जमवत कोविड (covid) नियमांचं उल्लंघन केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत आणि फटाके फोडत जल्लोष केला.
आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन करणार आहेत. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी, ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Nawab malik: नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी; सत्र न्यायालयाचा निर्णय
- Nawab Malik Arrested : मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ईडीची कारवाई, छगन भुजबळांचा आरोप
- Nawab Malik Arrest: 'मविआशी समोरासमोर लढता येत नसल्याने हे अफझलखानी वार सुरू आहेत,' खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha