एक्स्प्लोर
भाषण न करताच गेलो तर ब्रेकिंग न्यूज होईल, धनंजय मुंडेंना एबीपी माझाच्या बातमीचा धसका
‘आज मी भाषण नाही केले तर यांची ब्रेकिंग न्यूज होईल’, असं म्हणत दोन वेळा जाहीर कार्यक्रमांमधून भाषण न करताचं निघून जाण्याची वेळ आलेल्या पालकमंत्रि आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची फटकेबाजी.
बीड : ‘आज मी भाषण नाही केले तर यांची ब्रेकिंग न्यूज होईल’, असं म्हणत दोन वेळा जाहीर कार्यक्रमांमधून भाषण न करताचं निघून जाण्याची वेळ आलेल्या धनंजय मुंडेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. राज्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर धनंजय मुंडेंनी जाहीर भाषण केले.
मागच्या काही दिवसांमध्ये दोन वेळा जाहीर कार्यक्रमांमध्ये वेळेत न पोहोचल्याने धनंजय मुंडे यांना भाषण न करता घरी परतावे लागले होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तारातून टीका होत होती. यावेळी त्यांनी आपण भाषण नाही केले तर यांची ब्रेकिंग न्यूज झाली होती. तसेच ‘पवारांचा शिरस्ता मुंडे पाळणार का?’ अशा आशयाची बातमी एबीपी माझाने केल्याची आठवण करुन दिली. बीडचे पालकमंत्रिपद आणि सामाजिक न्यायमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांच्या भोवती कायम कार्यकर्त्यांचा गराडा असतो. कुणी वैयक्तिक तर कुणी सार्वजनिक कामासाठी त्यांच्या कार्यालय तर कधी घरी सगळीकडे अगदी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात. असा अनुभव यापूर्वी दोन कार्यक्रमात आला होता. मात्र यातूनही वेळ काढून धनंजय मुंडे आपल्या जाहीर कार्यक्रमाचे टाइमिंग पाळणार आहेत का हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर शुक्रवारी त्यांनी राज्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर भाषण केले.
अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये राज्य कबड्डी असोसिएशन आणि स्वर्गीय बालासाहेब लोमटे यांच्या स्मृती प्रचारार्थ ठेवलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आपल्या भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी, अशा स्पर्धा बघितल्या की मैदानात जाऊन खेळावस वाटतं. मीही बारावीपर्यंत कबड्डी खेळाडू असल्याती आठवण त्यांनी करुन दिली. आता कबड्डी जमेल का नाही माहित नाही, पण या ठिकाणी जर मी भाषण नाही केले तर त्याची बातमी होईल अशी कोपखळी मुंडेंनी मारली. तसेचं ज्या मैदानातून सात राज्य पातळीवरचे कबड्डीपटू पडले त्याच मैदानावर राज्यातील खेळाडूंना शुभेच्छा देत, या स्पर्धेसाठी धनंजय मुंडे यांनी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
Ambajogai Parli Road | एकाच रस्त्याचा चौथ्यांदा शुभारंभ, एकदा पंकजा मुंडे, दोनदा कॉन्ट्रॅक्टर तर आता धनंजय मुंडे | ABP Majha
संबंधीत बातम्या
पवारांचा शिरस्ता मुंडे पाळणार का? दुसऱ्यांदा भाषण न करता धनंजय मुंडे घरी परतले
एकाच रस्त्याचा चौथ्यांदा शुभारंभ, एकदा पंकजा मुंडे, दोनदा कॉन्ट्रॅक्टर तर आता धनंजय मुंडे करणार उद्घाटन
कट्टर राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर
बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement