एक्स्प्लोर
पवारांचा शिरस्ता मुंडे पाळणार का? दुसऱ्यांदा भाषण न करता धनंजय मुंडे घरी परतले
बीडचे पालकमंत्रिपद आणि सामाजिक न्यायमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा, पंधरा दिवसात दोन जाहीर कार्यक्रमात उशीराने आल्याने धनंजय मुंडेंवर भाषण न करताच घरी परतण्याची नामुष्की.
बीड : कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कार्यक्रमाला वेळेवर पोहोचणं हा पवार कुटुंबांचा शिरस्ता राहीला आहे. मग शरद पवार असोत की अजित पवार नेहमीच कार्यक्रमाला वेळेवर पोहोचत. एवढच नव्हे तर इतरांनीही वेळेवर कामाला सुरुवात केली पाहिजे असं सांगायलाही ते विसरत नाही. मात्र नव्यानेच मंत्री झालेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा इतका वाढला आहे की, पंधरा दिवसात दोन जाहीर कार्यक्रमात न बोलताच त्यांना परतावे लागले आहे.
धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऐतिहासिक अंबाजोगाई परळी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काल सहा वाजता परळी शहरांमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे तब्बल साडेनऊ वाजता पोहोचून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. मात्र या व्यासपीठावरुन धनंजय मुंडे उपस्थितांना संबोधित करणार होते. कार्यक्रम संपण्याची वेळ ही रात्री दहाची होती. व्यासपीठासमोर टाकलेल्या सतरंज्यांवर तब्बल दोन-अडीच तास लोक ताटकळत बसले होते. अखेर धनंजय मुंडे याठिकाणी बोलणार नाहीत असे जाहीर करण्यात आले आणि हा कार्यक्रम संपला.
विशेष म्हणजे काल अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी माजलगाव मध्ये तीन जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र या तिन्ही कार्यक्रमांच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळण्यात आल्या. पण तिथून पुढे परळीमध्ये पोहोचल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत विकास कामाची आढावा बैठक ठेवली होती. मात्र या विकासाच्या कामांची आढावा बैठक ही तब्बल साडेतीन तास चालली आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पूर्वनियोजित अशा उद्घाटन कार्यक्रमानंतरच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांना व्यासपीठावर न जाताच परतावे लागले.
पंधरा दिवसांपूर्वी ज्यावेळी धनंजय मुंडे यांचा परळीकरांनी भलामोठा नागरी सत्कार केला होता. त्या कार्यक्रमाच्या वेळीही धनंजय मुंडे रात्री अकरा वाजता व्यासपीठावर पोहोचलेल होते. त्यामुळे त्यांना जाहीर भाषण करता आले नव्हते. आता पंधरा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा फुलांनी सजलेले व्यासपीठ, खुर्च्यावर बसलेले लोक धनंजय मुंडे यांच्या प्रतीक्षेत होते मात्र अखेर धनंजय मुंडे हे वेळेत पोहोचले नाहीत आणि म्हणून त्यांना भाषण करता आले नाही.
बीडचे पालकमंत्रिपद आणि सामाजिक न्यायमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांच्या भोवती कायम कार्यकर्त्यांचा गराडा असतो. कुणी वैयक्तिक तर कुणी सार्वजनिक कामासाठी त्यांच्या कार्यालय तर कधी घरी सगळीकडे अगदी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात. मात्र यातूनही वेळ काढून धनंजय मुंडे आपल्या जाहीर कार्यक्रमाचे टाइमिंग पाळणार आहेत का हा मात्र प्रश्नच आहे.
संबंधीत बातम्या
एकाच रस्त्याचा चौथ्यांदा शुभारंभ, एकदा पंकजा मुंडे, दोनदा कॉन्ट्रॅक्टर तर आता धनंजय मुंडे करणार उद्घाटन
कट्टर राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर
बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement