एक्स्प्लोर
खासगी ट्रॅव्हल्सचं प्रवासभाडं महागलं, दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड
दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्यांना तिकीटाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्यांना तिकीटाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बसच्या भाड्याचे दर अव्वाच्या सव्वा वाढवल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुण्यातून नागपूर, अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीपेक्षा जास्त भाडं द्यावं लागतं. इतरवेळी हे तिकीट 1200 ते 1400 रुपयांच्या दरम्यान असतं. पण आत्ता ते 3000 रुपयांच्या पुढे गेलं आहे. तर मुंबईतूनही कोकणासह राज्यभरात जाणाऱ्या गाड्यांच्या बसभाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान दिवाळीच्या काळात वाहतुकीचे दर वाढलेले असले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं घट होताना दिसते आहे. आज पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेलच्या दरात 12 पैशांनी घट झाली आहे.
आणखी वाचा























