बुलढाण्यातील खामगावात चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम; प्रशासन अलर्ट मोडवर, शोधमोहीम सुरु
Buldhana Tiger Terror : बुलढाण्यातील खामगावात चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम असून वाघाला पकडण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तर वनविभागाकडून शोधमोहीम सुरु आहे.
Buldhana Tiger Terror : बुलढाण्यातील खामगावात सलग चौथ्या दिवशी वाघाची दहशत कायम आहे. वनविभागाकडून वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच आहेत. गेल्या चार दिवसांपासून शहरात वाघाचा मुक्तसंचार असल्यानं शहरात दहशत पसरली आहे. गेल्या शनिवारपासून वन विभागाच्या अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा अशा चार टीम या वाघाचा शोध घेत आहे. वाघाच्या जवळ पोहचल्यावरसुद्धा वाघाला बेशुद्ध करण्यात कर्मचाऱ्यांना अपयश आलं आहे.
बुलढाणा शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा वाघ सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाला आहे. तरीही वन विभागाच्या पथकाला हुलकावणी देत हा वाघ शहर आणि परिसरात काहींना दिसला आहे. शहरात अजूनही भीतीचं वातावरण असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं वाघाचा वावर असलेल्या भागांतील शाळा आज सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, विध्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळांनी स्वतः घेतला आहे. आधी कोरोनाने शाळा बंद होत्या आणि आता वाघाच्या दहशतीनं. मात्र वन विभाग युद्धस्तरावर शोध मोहीम राबवून हा वाघ जेरबंद होत नाहीये. त्यामुळे आता वाघाचं गूढ वनविभागाला उकलण्यात कधी यश मिळत? याची उत्सुकता समस्त खामगाव वासीयांना लागली आहे.
जमावबंदीचा आदेश मागे
काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जमावबंद, संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच अनेक कठोर निर्बंधही लावण्यात आले होते. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सध्या संपूर्ण राज्यभरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्याचं कारण कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा हिंसाचार वैगरे नसून तर एक वाघ (Tiger) होता. बुलढाण्यात एका वाघामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात वाघ शिरला आहे. गेल्या काही दिवसांपासून वन विभागाची टीम या वाघाचा शोध घेत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. एवढंच नव्हेतर वाघ असलेल्या भागांत कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं होतं. तसेच, वाघ असलेल्या भागांत नागरिकांना मुक्त संचार करण्यासही बंदी घालण्याता आली होती. परंतु, आता प्रशासनानं हे आदेश मागे घेतले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ambernath: अंबरनाथमध्ये बिबट्याच्या वावर, महिनाभरात दोनदा पाळीव प्राण्यांची शिकार; ग्रामस्थांमध्ये घबराट
- Chandrapur : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचा तुघलकी कारभार; चंद्रपुरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
देश-विदेशातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...