Buldhana News :खबरदार! विनापरवानगी डीजे वाजविल्यास होणार कारवाई; बुलढाणा शहर पोलिसांचा मोठा निर्णय
Buldhana News : आगामी काळात लग्नासह इतर मिरवणुकीत विनापरवाना डीजे वाजविल्यास कठोर कारवाईचा इशारा बुलढाणा शहर निरिक्षकांनी दिलाय.
Buldhana News : सध्या लग्न सराईची धूम सुरू असल्याने त्यात विनापरवाना डीजे वाजविण्यात येत असल्याचे बुलढाणा शहर पोलिसांच्या (Buldhana Police) निदर्शनात आले आहेत. परिणामी, आगामी काळात लग्नासह इतर मिरवणुकीत विनापरवाना डीजे (DJ) वाजविल्यास कठोर कारवाईचा इशारा बुलढाणा शहर (Buldhana News) निरिक्षकांनी दिलाय. सोमवार 29 एप्रिलला बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये सर्व समाजबांधावाची बैठक घेण्यात आली असून यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू करण्यात आलीय. यात लग्न आणि वरातीच्या मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्कश आवाजात डीजेच्या वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटनाही पुढे येऊ लागल्या आहे. परिणामी पोलिसांनी हा कठोर निर्णय घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.
बुलढाणा शहर पोलिसांचा मोठा निर्णय
बुलढाणा शहरात गेल्या 14 एप्रिल रोजी डीजेच्या किरकोळ वादातून एक तरूणाची निघृण हत्या करण्यात आली होती. तसेच शहरात काही ठिकाणी विनापरवाना डिजे वाजविण्यात येत असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहे. डीजे आला म्हणजे दारू आली आणि नशेत कोण काय करतील, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीला कुठे तरी आळा बसायला हवा. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात विनापरवानगी कुठेही डिजे वाजविल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी दिली आहे.
लग्नाच्या वरातीतील डीजेच्या गाण्यावरून दोन गटात तुफान राडा
बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी या गावात लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्याप्रकरणी दोन गटात तूफान राडा होता. या वादात एका गटाने लग्नाच्या मिरवणुकीतील चक्क डी.जेची (DJ) गाडी फोडली असून यात या गाडी आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या वादाला अचानक हिंसक वळण लागले, परिणामी दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Buldhana Police) तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रण आणली. तर या प्रकरणी अनेकांना अटकाही करण्यात आलीय. अलिकडे बुलढाणा जिल्ह्यात सतत घडत असलेल्या अशा घटनांमुळे बुलढणा पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या