एक्स्प्लोर

Buldhana Lok Sabha Constituency : शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलीस संरक्षण; शिंदे गटाच्या 'या' आमदाराने दिली होती धमकी

Lok Sabha Election 2024 : शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील  (Lok Sabha Election 2024) अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना राज्य सरकारने सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे.

Buldhana Lok Sabha Constituency : शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना राज्य सरकारने सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे. शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे विद्यामन आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ‘तुपकर यांची शिकार करण्याची’ धमकी दिली होती. त्यावरून तुपकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची खात्री सरकारला पटल्यानंतर सरकारने जिल्हा पोलीस अधीक्षकांना तुपकर यांना तातडीने संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. काल 30 एप्रिलला याबाबतचा आदेश प्राप्त होताच, आजपासून एक सशस्त्र पोलीस कर्मचारी तुपकरांच्या संरक्षणात देण्यात आलाय.

तुपकरांची शिकार करण्याची धमकी

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली आहे. परिणामी, या निवडणुकीत तुपकर यांच्या बाजूने सर्वाधिक मतदान (Buldhana Election) झाल्याचे गोपनीय रिपोर्ट आहेत. त्यातच निवडणूक काळात बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी फेसबुक लाईव्ह करत ‘रविकांत तुपकर यांची शिकार करू’, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याबाबत तुपकर यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. त्यावरून तुपकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल पोलिसांच्या गोपनीय शाखेने पोलिस अधीक्षकांमार्फत गृहमंत्रालयाला पाठवला होता. या अहवालाची आणि तुपकरांच्या पत्राची दखल घेऊन गृहमंत्रालयाने तुपकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश दिले होते. काल याबाबत आदेश प्राप्त होताच, एक सशस्त्र पोलीस कर्मचारी आजपासून तुपकरांच्या संरक्षणात देण्यात आलेला आहे.

प्रतापराव जाधव हरणारच, माजी मंत्र्याने लावली चक्क 9 लाखांची पैज

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात झालेली बुलढाण्यातील निवडणूक सध्या चर्चत राहत आहे. ती म्हणजे येथील क्षणा-क्षणाला बदलणारे राजकारण, उम्मेदवारांकडून एकमेकांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे. आता निवडणुकीच्या निकालाकडे जितकं राजकीय पक्षांचं, नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं. तितकंच लक्ष असतं ते कार्यकर्त्यांचं. त्यामुळे ‘तुमच्यासाठी कायपण’ असं म्हणणारे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने असाच किस्सा घडलाय. किस्सा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांच्या विश्वासाचा. 

लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार, यावर पैज लावण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख रुपयांची पैज असून पैज जिंकल्यावर पैज लावणाऱ्यास तब्बल 9.45 लाख रुपये मिळणार आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी (Subodh Saoji) यांनी ही पैज लावली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
Embed widget