एक्स्प्लोर
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार
![शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार Budget Session To Start After 4 Days Holiday शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/09162530/vidhanbhavan-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अडले आहेत.
याआधीही विधीमंडळाचं अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन गाजलं. मात्र जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोवर कामकाज चालू देऊ नका असा पवित्रा शिवसेनेने पवित्रा घेतला आहे.
फक्त उत्तर प्रदेशच नाही, महाराष्ट्रातही कर्जमुक्ती होऊ शकते: मुनगंटीवार
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही कर्जमाफीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्याची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आज सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे.
दुसरीकडे अधिवेशनाच्या कामकाजाआधी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.
दरम्यान, 'पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. पण ती फक्त उत्तर प्रदेशसाठी नाही, जेव्हा कर्जमुक्ती होईल तेव्हा महाराष्ट्रासाठी पण होईल,’असे स्पष्ट संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)