एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Breaking News LIVE :आर्यन खानचा मुक्काम 20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच 

Breaking News LIVE Updates, 14 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE :आर्यन खानचा मुक्काम  20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच 

Background

CIDCOचा तुघलकी निर्णय, घर लाभार्थ्यांकडून 4 लाखापर्यंत अधिकची वसूली, कार्यालयीन दिरंगाईचा भूर्दंड लाभार्थ्यांच्या माथी
सिडकोच्या (CIDCO) माध्यमातून नवी मुंबई आणि पनवेल (Navi Mumbai Panvel) परिसरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जात आहे. मात्र आपल्या तुघलकी निर्णयाने घर लाभार्थ्यांकडून चक्क 4  लाखापर्यंत सिडकोने अधिकचे पैसे उकळण्यास सुरवात केली आहे. कार्यालयीन कामाच्या दिरंगाईचा बोजा सर्वसामान्यांच्या माथी मारण्याचे काम सिडकोने केले आहे. 2018 मध्ये सिडकोने काढलेल्या लाॅटरीत वेटिंगवर आलेल्या लोकांना सिडकोने 2019 मध्ये अलाॅटमेंन्ट लेटर देत त्यांना घराचे मालक झाल्याचे कळवले. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न  कोट्यातून ही घरे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न असलेल्या घरांची किंमत 18 लाखापर्यंत तर अल्प उत्पन्न कोट्यातील घर 25  लाखाला सिडको देणार होती. 2019 मध्ये काढलेल्या ॲलाॅटमेन्ट पत्रात नियामाप्रमाणे सिडकोने घरांची किंमत ठरवून लोकांना पत्रं पाठवली होती. मात्र त्यानंतर आपल्याच कार्यालयातील लेटलतीफ कामामुळे गेली दोन वर्ष झाली सिडकोने वेटिंगवर असलेल्या घर लाभार्थ्यांकडून पैसे घेण्यास सुरवात केली नाही. अखेर दोन वर्षाने जाग आलेल्या सिडकोच्या पणन विभागाचा तुघलकी कारभार समोर आला आहे. वेटिंगवरील घर लाभार्थ्यांना 1 ॲाक्टोबर रोजी पत्र पाठवत 30 ॲाक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली आहे. त्याच बरोबर 18 लाखांच्या घराची किंमत दीड-दोन लाखांनी वाढवली आहे. तर 25 लाखांच्या घराची किंमत 3 ते 4 लाखांनी वाढवून सर्वसामान्यांच्या गळ्यात मारली आहे.

शरद पवार सर्वांचे गुरु, 'ती' ऑफर न स्विकारण्याइतके ते कच्च्या गुरुचे चेले नाहीत: चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पुन्हा महाविकास आघाडी (Maha Vikas aghadi) आणि शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य काहीही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मग तो कोळसा कमी असोत, की इतर काहीही असो, नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जर पवार यांना केंद्राची ॲाफर होती, तर ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत.  केंद्रात सत्ता असलेल्या पक्षासोबत जाणे याची त्यांनी निवड केली असती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना पवार काय बोलतात हे कळते, असंही पाटील म्हणाले.  महाविकास आघाडीतील नाराजी आपल्या पदरात काही टाकून घेण्यासाठी असते. त्यावरून काही निष्कर्ष काढण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

फ्ल्यू संसर्गाचा धोका वाढतोय; संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यांवरील प्रत्येकानं फ्लु शॉट्स घेणं गरजेचं
 इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला 'सिझनल फ्लू' म्हटले जाते. या 'फ्लू' पासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध असून त्याला 'फ्लू शॉट्स' असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 'फ्लू'पासून बचावासाठी ही लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. 'फ्लू' विरोधातील लसीमुळे 'इन्फ्लूएन्झा' व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात म्हणून वेळीच फ्लू ची लस घेऊन त्यास प्रतिबंध करण्याचे आवाहन तज्ञ डाँक्टरांनी केले आहे. ताप, अंग दुखणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागेवर सूज येणे यासारख्या दुष्परिणामांमुळे फ्लू शॉट्स घेण्यापासून स्वतःला थांबवू नका कारण ते दुष्परिणाम एक ते दोन दिवसात निघून जातात. पुण्याच्या अपोलो क्लिनिकचे जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले की, फ्लू तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण लहान मुले, गर्भवती महिला, 65 वर्षांवरील व्यक्ती आणि दम्यासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. फ्लूची लस मिळाल्याने आजाराची गंभीरता कमी होईल आणि फ्लूशी संबंधित हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका देखील कमी होईल. फ्लू लसीकरण तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गंभीर गुंतागुंतीपासून वाचवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते ज्यामुळे न्युमोनिया होतो. जर तुम्हाला आधीच फ्लू असेल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते आणि तुम्हाला कोविड संसर्गास बळी पाडते. 

IPL 2021 : पर्पल कॅप हर्षलकडे तर ऑरेंज कॅपसाठी ऋतुराजची दावेदारी, आतापर्यंत सर्वाधिक चौकार, षटकार कुणाचे?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत. यंदा भारतीय खेळाडूंनी जोरदार प्रदर्शन केलं आहे. यात विशेष कामगिरी केली आहे चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं. ऋतुराज सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी आता त्याला केवळ 23 धावांची गरज आहे. अंतिम सामन्यात तो या यशाला नक्कीच गवसणी घालेल, अशी अपेक्षा आहे.ऋतुराज गायकवाडनं राजस्थान विरुद्ध शतक झळकावलं आहे तर यंदाच्या सिझनमध्ये त्यानं चार अर्धशतकं झळकावली आहेत.

 

16:50 PM (IST)  •  14 Oct 2021

आर्यन खानचा मुक्काम 20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच 

आर्यन खानचा मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच 

15:14 PM (IST)  •  14 Oct 2021

मुंबईतल्या चेंबूरमध्ये असलेल्या चेंबूर कॅम्पमधील अलंकार ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या चाकू आणि पिस्तूलाचा धाक दाखवून लूट

मुंबईतल्या चेंबूरमध्ये असलेल्या चेंबूर कॅम्पमधे अलंकार ज्वेलर्समध्ये दिवसा ढवळ्या चाकू आणि पिस्तूलाचा धाक दाखवून लूट करण्यात आली. आरसी रोडवर सिंधी कॅम्प आहे, याठिकाणी एका रांगेत 3 ज्वेलर्सची दुकान आहेत. यातील अलंकार ज्वेलर्समध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास 3 जण आले, त्यातील एकाच्या हातात पिस्तूल, दुसऱ्याच्या हातात चाकू होता तर तिसऱ्या व्यक्तीने धमकावून सोने पैसे मागू लागला. दुकान मालकाने देण्यास नकार दिल्याने त्याच्या हातावर चाकून वार केला त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे या तिकडीने हातात जे लागेल ते घेऊन पोबारा केला. दुकानदाराने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. चेंबूर पोलीस तसेच गुन्हे शाखा कर्मच्यारी घटनास्थळी पोहचले आहेत. याठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा आहे त्या आधारे लुटारूंना शोधण्यात पोलिसांना मदत होणार आहे.

15:11 PM (IST)  •  14 Oct 2021

नागपुरात असलेल्या पवित्र दीक्षाभूमीवर 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनावर बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण

नागपुरात असलेल्या पवित्र दीक्षाभूमीवर 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनावर बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना करण्यात आली. तसेच कोरोनाकाळात ज्या लोकांचे मृत्यू झाले आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे मुख्य कार्यक्रम रद्द करण्यात आले असून लोकांनी ऑनलाइन पद्धतीनेच दीक्षाभूमीचे दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात समता सैनिक दलाचे निवडक पदाधिकारी, दीक्षाभूमी परिवारांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

13:32 PM (IST)  •  14 Oct 2021

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका. ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली. अडसुळांना सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. 

13:31 PM (IST)  •  14 Oct 2021

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली, अडसुळांना सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Embed widget