Breaking News LIVE : HSC EXAM UPDATE : 12 वी परीक्षेसंदर्भात उद्या निर्णय, सूत्रांची माहिती
Breaking News LIVE Updates, 31 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Break The Chain | ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरु, काय बंद?
ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.
यासाठी 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.
पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
- ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
- सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.
- सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
- अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
- दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
- कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
- कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते
CM Uddhav Thackeray Speech: संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी परीक्षांचा गोंधळ अद्याप कायम आहे. दहावीस बारावी परीक्षांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं. राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे, आता बारावी परीक्षांचा देखील घेणार आहोत. परंतु एका राज्यात होत आहे, दुसर्या राज्यात नाही असे न करता एकसमान निर्णय घेतला जायला हवा. धोरण एक हवे. माननीय पंतप्रधानांना यापूर्वी देखील विनंती केली आहे, परत करणार आहे. शिक्षण क्षेत्राबाबत क्रांतिकारक निर्णय घेण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कोरोनामुक्त गाव मोहिम राबवायची गरज
कोरोनाची रुग्णसंख्या शहरी भागात कमी होत आहे मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गाव पातळीवर याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी हे करुन दाखवलं आहे. घाटणे, तालुका मोहोळ गावचे ऋतुराज देशमुख, तर कोमल करपे, आंतळुली, दक्षिण सोलापूर या दोन तरुण संरपंचांनी आपलं गाव कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे. आपल्याला देखील आता कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
12 वी परीक्षेसंदर्भात उद्या निर्णय, सूत्रांची माहिती
12 वी परीक्षेसंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल उद्या या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
HSC EXAM UPDATE : बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार
बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल घोषणा करणार, परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी, केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक, कर्मचारी यांना प्राधान्याने लस दिली जाईल
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी यांना 9 लाखांची लाच मगितल्याप्रकरणी अटक
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी (वय 44) यांना 9 लाखाची लाच मगितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ठेकेदाराने पूर्ण केलेेेल्या कामाचे बिल देन्यासाठी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी आणि त्यांचा सहकारी विशाल अंकुश मिंड यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले होते..या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्याम पोशेट्टी यांनी याच मागण्या सहकार्य केले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करीत श्याम पोशेट्टी यांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांची उद्या शरद पवार यांच्या उपस्थित बैठक
उद्या 3 ते 5 वाजता राष्ट्रवादीचे आमदार, खासदार यांची शरद पवार यांच्या उपस्थित बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 वाजता राष्ट्रवादीचे मंत्री यांची शरद पवार यांच्या सोबत बैठक आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. आमदार आणि त्यांच्या मतदार संघातील प्रश्न, मराठा आरक्षण संदर्भात चर्चा, पदोन्नतीच्या विषयावर चर्चा होईल तसेच पक्षाने काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा, सध्याच्या काळात राज्यात दहावीची परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा, सध्याच्या काळात राज्यात दहावीची परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा दावा, उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी