एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Breaking News LIVE : नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल

Breaking News LIVE Updates, 27 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल

Background

Maharashtra Nigh Curfew: कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता विनाकारण होणारी गर्दी टाळणे, वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला. शिवाय या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021)  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

Pune corona Guidelines | पुण्यासाठी नवीन कोरोना नियमावली; पाहा काय बंद काय सुरू?
 मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता आता कठोर पावलं उचलण्याचा इशारा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तूर्तास पुण्यात कोरोनाचे रुग्ण पाहता रुग्णसंख्या वाढ ही प्रशासनापुढं उभी असणारी मोठी अडचण ठरत आहे. याच धर्तीवर सध्या लॉकडाऊन लागू केला नसला तरीही पुण्यात काही निर्बंध मात्र लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं काही सेवांवर याचा परिणाम होणार आहे. 

Pune Fire | पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग
पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये  रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली. आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासकीय रेखाकला परीक्षा न घेण्याचा निर्णय
राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती विचारात घेतात शिक्षण विभागाने शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) 2020 न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जे दहावी बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षा दरवर्षी देतात त्यांना यावर्षी सवलतीचे अतिरिक्त कला गुण मिळणार नसल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे

IND VS ENG : इंग्लंडचं जोरदार प्रत्युत्तर; भारताचा 6 गडी राखून मालिकेत 1-1 अशी बरोबरी
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 336 धावांचा डोंगर इंग्लंडपुढे उभारला होता. असे वाटत होते की इंग्लंडला 337 धावांचे कठीण लक्ष्य साध्य करण्यात अडचण येऊ शकते. परंतु, जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकामुळे आणि बेन स्टोक्सच्या 99 धावांच्या जोरदार खेळीमुळे इंग्लंडला हे लक्ष्य सहज गाठता आले. नियमित कर्णधार मॉर्गनच्या अनुपस्थितीत इंग्लंड जोस बटलरच्या नेतृत्वात उतरला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. मात्र, भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन केवळ 4 धावांवर तंबूत परतला. रोहित शर्माही 25 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. कोहलीने 66 धावा केल्या तर राहुलने शानदार शतक ठोकले. यानंतर ऋषभ पंतने 77 धावा केल्या आणि हार्दिक पांड्यानेही 35 धावा केल्या.

22:48 PM (IST)  •  27 Mar 2021

नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल

नाशिक एअरपोर्टवर हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला कॉल. रात्री पावणे नऊवाजता उडणारे विमान थांबवले. बॉम्ब शोध पथकाकडून तपासणी सुरु. ज्या व्यक्तीने कॉल दिला त्याचे तिकीटावरुनही एअरलाईन स्टाफसोबत भांडण झाले होते, अशी प्राथमिक माहिती. त्यामुळे हा खोडसाळपणा आहे की नक्की काय प्रकार याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरु. कॉल करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात.

19:55 PM (IST)  •  27 Mar 2021

लातूर जिल्ह्यात 483 कोरोनाबाधित रुग्ण तर 3 रुग्णाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात 483 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 3 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यात 1027 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 126 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 2536 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 338 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30821 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 3682 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 732 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 26407 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 181 आहे.

19:54 PM (IST)  •  27 Mar 2021

यवतमाळ कोरोना अपडेट

यवतमाळ जिल्ह्यात पाच मृत्युसह जिल्ह्यात 418 जण पॉझिटिव्ह. 392 जण कोरोनामुक्त. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2448 ॲक्टीव्ह रुग्ण. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या : 27151. बरे झालेल्यांची एकूण संख्या : 24095. तर एकूण 608 मृत्युची नोंद.

19:53 PM (IST)  •  27 Mar 2021

परभणी कोरोना अपडेट

परभणी जिल्ह्यातील रुग्णसंख्येतील वाढ कायम. आज जिल्ह्यात 246 नवीन रुग्णांची भर तर 8 रुग्णांचा मृत्यू. दिवसभरात 116 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज. सध्या एकुण 1382 रुग्णांवर उपचार सुरू.

19:53 PM (IST)  •  27 Mar 2021

नांदेड कोरोना अपडेट

आज एकूण 4257 टेस्टिंगपैकी 1073 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 554 आहेत. आज 638 बरे होऊन घरी गेले असून 16 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget