(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : दिल्लीमध्ये बर्ड फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Breaking News LIVE Updates, 21 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
Bird Flu Death : कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप सुरुच आहे. अशातच यंदा देशात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात 11 वर्षाच्या मुलाचा एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हरियाणामधील होता. एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात पाठवण्यात आलं आहे.
या एविएन इन्फ्लुएन्जा H5N1ची लागण झालेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला देशातील अनेक राज्यांत कोरोनासोबतच बर्ड फ्लूचाही प्रादुर्भाव दिसून आला होता. अनेक ठिकाणी बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या.
"भाजप सरकारने पॅगेसेसच्या माध्यमातून जर फोन टॅप केले नाहीत, तर त्यांनी तसं स्पष्टीकरण द्यावं. जर खरेदी केलं असेल तर तसं देखील सांगावं. आणि ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, त्यांनी कोणतं देशविरोधी कृत्य केलं होतं हे देखील स्पष्ट करावं. आम्हाला संशय आहे, ज्या प्रकारे सरकार विषय फिरवत आहे. यावरून स्पष्ट होतं आहे की, दाल में कुछ काला है" आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पॅगेसेस प्रकरणाचा समाचार घेतला.
याबाबत अधिक माहिती देताना नवाब मलिक म्हणाले की, "पॅगेसेसच्या माध्यमातून पत्रकारांचे फोन हॅक झाले. यामध्ये काही सरकारी व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील फोन हॅक झाले असं समोर येत आहे. आता केंद्राकडून खुलासा होतोय की, कुठलेही फोन हॅक होत नाहीत. प्रश्न असा आहे की, पॅगेसेसकडून हा स्पायवेअर भारत सरकारनं किंवा भारत सरकारच्या एजन्सीने खरेदी केले की नाही. सर्वप्रथम सरकारने याचा खुलासा करावा. जर त्यांनी खरेदी केलं नाही तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगावं. पण सरकार याबाबत स्पष्टपणे सांगत नाही की, आम्ही हॅक केलं नाही. त्याचा अर्थ निघतो की, सरकार किंवा सरकारच्या एजन्सीने खरेदी केलेलं आहे."
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे. श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना एक वेळ अशी होती की भारताची जिंकण्याची आशा मावळली होती. 197 वर 7 गडी बाद असल्यामुळे श्रीलंकेचं पारडं जड होतं. मात्र दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी 84 धावांची अभेद्य पार्टनरशीप केली.
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला पृथ्वी शॉ अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला ईशान किशनही एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनही 29 धावा करुन बाद झाला. शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष पांडे 37 धावांवर रनआऊट झाला. मनिषनंतर आलेला हार्दिक पांड्याही खातं न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर अर्धशतक साजरं करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. आता कृणाल पांड्यावर भारताच्या खेळाची धुरा उरलेली असताना तोही 35 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना गमावला अशी स्थिती असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने जबाबदारीने खेळी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची नाबाद खेळी केली. यात दीपक चहरने 69 धावांची आणि भुवनेश्वर कुमारने 19 नाबाद धावांची खेळी केली.
सलग चार दिवस बंद असलेले पुण्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण गुरुवारी सुरु होणार
सलग चार दिवस बंद असलेले पुण्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण गुरुवारी सुरु होणार आहे. कोविशील्ड लस पुण्यातील 185 लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या प्रत्येक केंद्रावर कोविशील्ड लसीचे 100 डोस उपलब्ध असतील. तर कोवॅक्सिन लस शहरातील सहा केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक केंद्रांवर लसीचे तीनशे डोस देण्यात येणार आहेत.
इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट तांत्रिक कारणास्तव बंद, बोर्डची माहिती
इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाइन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याच बोर्डकडून सांगण्यात आलंय. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल तसेच परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. 20 जुलै सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते 26 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र काल पासून संकेतस्थळावर अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी बोर्डाला प्राप्त झाल्यानंतर अखेर बोर्डाने हे संकेतस्थळ काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक अडचण दुरुस्त झाल्यानंतर हेच संकेत स्थळ पुन्हा पूर्ववत होईल विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील.
रायगड - अलिबाग येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेणारा कैदी पळाला
रायगड - अलिबाग येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेणारा कैदी पळाला, कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन, अलिबाग येथील नेहुली कोविड सेंटरमध्ये घेत होता उपचार
Corona Update : राज्यात आज 8159 नव्या रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्णांना डिस्चार्ज
Corona Update : राज्यात आज 8159 नव्या रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात सध्या 94745 रुग्णांवर उपचार सुरु
दिल्लीमध्ये बर्ड फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क
दिल्लीमध्ये बर्ड फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर अधिक काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.