एक्स्प्लोर

Pegasus Spyware : फोन टॅप केले नाहीत तर स्पष्टपणे सांगा, सरकार ज्याप्रकारे विषय फिरवतंय, यावरून स्पष्ट होतंय, 'दाल में कुछ काला है' : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पॅगेसस प्रकरणावरुन भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

मुंबई : "भाजप सरकारने पॅगेसेसच्या माध्यमातून जर फोन टॅप केले नाहीत, तर त्यांनी तसं स्पष्टीकरण द्यावं. जर खरेदी केलं असेल तर तसं देखील सांगावं. आणि ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, त्यांनी कोणतं देशविरोधी कृत्य केलं होतं हे देखील स्पष्ट करावं. आम्हाला संशय आहे, ज्या प्रकारे सरकार विषय फिरवत आहे. यावरून स्पष्ट होतं आहे की, दाल में कुछ काला है" आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पॅगेसेस प्रकरणाचा समाचार घेतला. 

याबाबत अधिक माहिती देताना नवाब मलिक म्हणाले की, "पॅगेसेसच्या माध्यमातून पत्रकारांचे फोन हॅक झाले. यामध्ये काही सरकारी व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील फोन हॅक झाले असं समोर येत आहे. आता केंद्राकडून खुलासा होतोय की, कुठलेही फोन हॅक होत नाहीत. प्रश्न असा आहे की, पॅगेसेसकडून हा स्पायवेअर भारत सरकारनं किंवा भारत सरकारच्या एजन्सीने खरेदी केले की नाही. सर्वप्रथम सरकारने याचा खुलासा करावा. जर त्यांनी खरेदी केलं नाही तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगावं. पण सरकार याबाबत स्पष्टपणे सांगत नाही की, आम्ही हॅक केलं नाही. त्याचा अर्थ निघतो की, सरकार किंवा सरकारच्या एजन्सीने खरेदी केलेलं आहे."

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "याचा वापर करण्याबाबत कोणीही आक्षेप घेत नाही. खरेदी केला असाल, वापर करत असाल तर कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्यानुसार एखाद्या व्यक्तीवर संशय असेल तर त्यांना परवानगी मिळू शकते. आणि जर परवानगी घेऊन सर्व फोन टॅप केले असेल तर सरकारने उघडपणे सांगावं आम्ही परवानगी घेऊन टॅप केले आहेत. सरकार अजूनही सांगत नाही आम्ही खरेदी केले की नाही केलं आणि फोन टॅप केले की नाही केले. परवानगी दिली असेल तर या देशातील पत्रकार देशविरोधी कामे करत आहेत का? सरकारी काम करणारे व्यक्ती देशविरोधी काम करत आहेत का? किंवा विरोधी पक्षांचे नेते याचा फोन निवडणूक आयोगाच्या नेत्यांचा फोन टॅप करायची काय गरज होती."

"यातून आंतरराष्ट्रीय कट आहे, असं सांगितलं जातं आहे. 8 पेक्षा जास्त देशांचे फोन टॅप होत होत होते, याबाबत स्पष्टपणे सांगावं. आम्ही हॅक केलं नाही हे बोलणं यामध्ये सरकार काहीतरी लपवत आहे. ते म्हणत आहेत, मनमोहन सिंगांच्या काळात झालं होत तर त्याकाळात जे फोन टॅप करत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अटक करावं. बेकायदेशीरपणे फोन टॅप होत होते, तर त्यांची नावं सांगा आणि अटक करा. सरकार ज्या प्रकारे विषय फिरवत आहे त्यावरून असं वाटतंय दाल में कुछ काला है! या राज्यात देखील याच्या वापराबाबत चर्चा सुरु झाली होती. त्याकाळात असं काही लोकं सांगत होते की, वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये ऑफिस सुरु करुन त्याकाळात त्याठिकाणी कामे सुरु होती. त्याकाळात तत्कालीन गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी चौकशी करू असं सांगितलं होतं. आता तो तपास कुठं पर्यत गेला आहे, याबाबत माहिती नाही. याबाबत गृहमंत्री बोलू शकतील.", असं नवाब मलिक म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Amit Shah : मतदार यादीतील घोटाळेबाज अमित शाह, राऊतांचा हल्लाबोलTuljapur : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा दाखलMVA Meeting Update : मविआत तणातणी? ठाकरेंनी बोलावली तातडीने बैठकABP Majha Headlines : 12 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
Maharashtra Assembly Elections 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
Embed widget