(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : "योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या", काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
Breaking News LIVE Updates, 12 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी राज्यात विक्रमी 63,294 नवीन रुग्णांचे निदान
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे.
मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची बैठक; ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी. तसेच लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Remdesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, भारत सरकारचा मोठा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थिती सुधारेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. स्थानिक कंपन्या ज्या रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करतात त्यांना इंजेक्शनच्या साठ्याविषयीची माहिती वेबसाईटवर ठेवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून डिस्ट्रिब्युशन होत आहे त्याची माहितीही कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली आहे. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे या बैठकीनंतर राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे.
परभणीत वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह पाऊस
परभणीत वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह पाऊस, अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे फळपीक आणि आंब्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
भिंवडी शहरात एकतर्फी प्रेमातून मुलीचे ओठ कापले, दाताने चावून ओठ कापले
भिवंडी शहरात एकतर्फी प्रेमातून मुलीचे ओठ कापले, दाताने चावून ओठ कापले, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, मुलीला लग्नासाठी केली होती मागणी, मुलीने व नातेवाईकांनी लग्नासाठी दिला होता नकार, मुलीवर केईम रुग्णालयात उपचार सुरू, शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बुलडाणा : नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाचा कहर
बुलडाणा : नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाचा कहर, गावातील एका कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारात गेलेल्या 150 पैकी 77 जणांना कोरोनाची लागण, संपूर्ण गाव प्रतिबंधित गाव म्हणून घोषित
"योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या", काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
राज्यांना लस पुरवताना त्या त्या राज्यातल्या सक्रिय केस आणि भविष्यातला संभाव्य ग्राफ लक्षात घेऊन पुरवठा करा. कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा. सध्या वेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर यासह रेमडीसिविर आणि इतर औषधांवरही जीएसटी लागू होतो. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा, असे सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे.
पुण्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीला
पुण्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीला.. शहरातील वाढत्या कोरोनाच्या संकटात नागरिकांना योग्य आणि पुरेशा आरोग्य सुविधा मिळाव्यात यासंदर्भात भेट, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतली भेट