Breaking News LIVE : मुंबई पोलीस आयुक्तांची बदली? रात्री उशीरापर्यंत वर्षा बंगल्यावर बैठक
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात नव्या गाईडलाईन्स, लग्नकार्यांसाठी 50 तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांनाच परवानगी
नियम पाळले नाहीत तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, महापौरांचा इशारा तर नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर निर्बंध तर खान्देशात अलर्ट
राज्यात काल नव्या 15,051 कोरोना रुग्णांची नोंद, तर 48 रुग्णांचा मृत्यू; कोरोनाचा रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर
नाशिकमध्ये पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालयं आणि लॉन्समध्ये लग्न सोहळ्यावर बंदी, आर्थिक नुकसानामुळे मंगल कार्यालय चालक-मालकांचा विरोध
मनसुख प्रकरणात अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास बदली करावी, राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सूचना,वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं अखेर निलंबन
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध,एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रश्नपेढीचा परीक्षेच्या तयारीसाठी फायदा
सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीति राज श्रॉफ आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात कारवाई
गुरुवारपासून तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज 16,000 हापूस आंब्यांची आवक, पेटीला 1500 ते सहा हजार रुपयांचा दर
मोदी स्टेडियमवर होणारे भारत-इंग्लंड उर्वरीत टी-२० सामने प्रेक्षकांविनाच, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं गुजरात क्रिकेट असोशिएशनचा निर्णय
पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर, बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अनिल परबही उपस्थित
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात, कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकांती, अस्वल जोड़ीची गावकूडे कूच
बुलढाणा शहराला जंगलाचा वेढा आहे, या जंगलातील असंख्य हिंसक प्राणी उन्हाळ्यात जंगलाच्या आजुबाजुच्या गावाकडे कूच करीत असतात, जंगलातील पानवठे आटले की , अस्वल, राणडुक्कर, बिबट गावाकडे कूच करतात त्यांमुळे मानवी जिवाला धोका निर्माण होत आहे
सचिन वाझे यांचे तीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले
सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका दिला आहे. वाझे यांचे तीन अर्ज एनआयए कोर्टाने फेटाळले. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अमान्य केले आहेत. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टाने अंशत: मान्य केली. चौकशीच्यावेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा देण्यात आली.
सचिन वाझे प्रकरणावर भेट नव्हती, शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट संपली आहे. या भेटीबाबत ते म्हणाले की, "सगळं आलबेल आहे. शरद पवार यांना मी नेहमी भेटत असतो. ही भेट सचिन वाझे प्रकरणावर नव्हती. नाराजीचा कुठलाही प्रश्न नाही. शरद पवार यांची नाराजी कधी दिसत नसते ते चिंतन करत असतात."