Breaking News LIVE: सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती थाटामाटात साजरी करणार : निलेश राणे
Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
केंद्र सरकारचे कर्मचारी कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहतील; कार्मिक मंत्रालयाचे निर्देश
केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश कार्मिक मंत्रालयाने रविवारी दिले आहेत. कार्मिक मंत्रालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. राष्ट्रीय राजधानीसहीत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. परंतु, कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारनं काह निर्णय घेतल्याचं सागितलं आहे.
हौस म्हणून चक्क हेलिकॉप्टरचं केलं खरेदी
हौसेला मोल नसतं हेचं खरं.. भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी उद्योजक असलेल्या जनार्दन भोईर यांनी हौसेखातर चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलं आहे. या हेलिकॉप्टरसाठी भोईर यांनी शेतातचं हॅलीपॅड उभारलं आहे. भोईर यांच्या या हेलिकॉप्टरची चर्चा आता जिल्ह्यात पसरली आहे.
देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा धक्कादायक खुलासा
देशातील 30 टक्के वाहन परवाने हे बोगस आहेत. हा धक्कादायक खुलासा आज नागपुरात खुद्द केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी ह्यांनी केलाय. मात्र, त्याचबरोबर आपले अधिकारी आणि इंजिनियर्स ह्यांना ह्या बोगस लायसन्स, रस्त्यावरचे मृत्यू ह्याला जवाबदार धरले आहे. गडकरी हे रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ह्या कार्यक्रमाला अभिनेता मकरंद अनासपुरेही उपस्थित होते.
पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला सध्या राजकीय वळण मिळालं आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे. पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बातचित करताना त्यांनी माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज होतं, असंही ते म्हणाले आहेत.