एक्स्प्लोर
बुलडाण्यात बोलेरो- कंटेनरचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
माहितीनुसार, क्षीरसागर परिवार वाशिम वरून परत येत असताना हा अपघात घडला. कन्नड येथील क्षीरसागर परिवार त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून परत येताना हा अपघात झाला.
बुलडाणा : बुलडाण्याच्या मेहकरजवळ अंजनी खुर्द येथे बोलेरो आणि कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या दरम्यान झाला.
माहितीनुसार, क्षीरसागर परिवार वाशिम वरून परत येत असताना हा अपघात घडला. कन्नड येथील क्षीरसागर परिवार त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून परत येताना हा अपघात झाला.
या अपघातात मनोहर क्षीरसागर (70) मेघा क्षीरसागर (35),नलिनी क्षीरसागर (66) यांच्यासह बोलेरो चालक सुखदेव नागरे (25) हे जागीर मृत झाले.
15 एप्रिलला याच ठिकाणी असाच एक मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात महू येथून येत असताना जुमडे कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले होते. हा अपघात स्कॉर्पिओ आणि ट्रक मध्ये झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement