एक्स्प्लोर
आता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील

मुंबई: आता झाली एवढी कटुता पुरे झाली, आता समन्वय आणि न्यायाने यापुढे होईल. भाजप आणि शिवसेनेला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हे दोघे एकत्र येणार नाही तर काँग्रेससोबत एकत्र येणार का? असं म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप मुंबईत एकत्र येतील, असे संकेत दिले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
भाजपला राज्यभरात भरघोस यश मिळालं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मोठे आहेत. ते दोघेही क्षुल्लक मुद्दे बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येतील, असं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
महापालिकेत आम्ही सम-समान आहोत. त्यामुळे पारदर्शकता हा मुद्दा कायम ठेवून यापुढेही वाटचाल सुरु राहील, असं चंद्रकांतदादा म्हणाले.
शिवसेना-भाजपमधील समन्वयाचं काम आवडीने करेन, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या
मुंबईत भाजपच मोठा पक्ष : आशिष शेलार
पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार!
Maharastra Election Results LIVE : मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये चुरस
मुंंबई महापालिका निवडणूक: प्रत्येक वॉर्डनुसार निकाल
मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
