एक्स्प्लोर
नागपुरातील गुंडांकडून जादूटोण्याचा वापर!
नागपूर: गुंडांच्या टोळ्या विरोधकांचा वचपा काढण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कुणी पैसे मोजून विरोधकांची हत्या करण्यासाठी सुपारी देतं. तर कुणी स्वतःच हत्यार हातात घेऊन समोरच्याचा खातमा करतं. मात्र, नागपुरातल्या गुंड टोळ्यांनी विरोधकांना शह देण्यासाठी हत्यार ठेवून वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यामुळं पोलिसही चांगलेच चक्रावून गेले आहेत.
नागपुरातील कुख्यात गुंड, अशी ओळख असलेल्या संजय फातोडेच्या घरातले सगळेच दहशतीखाली आहेत. त्यामागचं कारण म्हणजे दारासमोर ठेवलेलं मंतरलेलं लिंबू.
नागपूरच्या पांढराबोडी परिसरात संजय फातोडेचं दुमजली घर आहे. आज सकाळी फातोडेच्या पत्नी सुरेखा यांनी दरवाजा उघडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून फातोडेच्या घरासमोर असे अघोरी प्रकार सुरू असल्याची तक्रार ऐकायला मिळते आहे.
संजय फातोडे हा नागपुरच्या भाई गँगचा सक्रीय सदस्य आहे. त्याच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल आहे. मात्र, सध्या भाई गँग दोन गटात विभागल्यामुळं एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धमक्या आणि दमदाटी करून संजय बधत नाही म्हटल्यावर, विरोधकांनी जादूटोण्याचं हत्यार उपसलं आहे. अशी गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे.
नागपूरच्या टोळ्यांनी एकमेकांविरोधात जादूटोण्याचं हत्यार उपसलेलं पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement