एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमावस्येच्या मध्यरात्री आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर भानामतीचा प्रकार
कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोन वेळा भानामतीचा प्रकार घडला आहे. पांढऱ्या कपड्यात हळद-कुंकू आणि बाहुली बांधून बंगल्यासमोरच्या झुडुपांत ठेवण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोन वेळा भानामतीचा प्रकार घडला आहे. पांढऱ्या कपड्यात हळद-कुंकू आणि बाहुली बांधून बंगल्यासमोरच्या झुडुपांत ठेवण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडत असलेल्या या प्रकारांमुळे सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कसबा बावड्यातील आमदार सतेज पाटील यांच्या यशवंत निवास या निवासस्थानासमोरच्या झुडुपांमध्ये पांढऱ्या कपड्यात बांधलेली काळी बाहुली टाकण्यात आली होती. या घटनेला चारच दिवस झाले आहेत. त्यानंतर मंगळवारी अमावस्येच्या मध्यरात्री पुन्हा एकदा बाहुली टाकण्यात आली आहे. स्थानिकांच्या मते हा भानामतीचा प्रकार असून जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.
व्हिडीओ पाहा
निवडणुकांच्या तोंडावर काळ्या जादूचा वापर करणे हे कोल्हापूर जिल्ह्याला नवीन नाही. यापूर्वीच्या अनेक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याबरोबरच सेवा संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशा प्रकारच्या काळ्या जादूचा काही उमेदवारांनी वापर केल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे.
आमदार सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात वजनदार व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. मंगळवारी रात्री त्यांच्या घराबाहेर घडलेल्या या भानामतीच्या प्रकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
मुंबई
नाशिक
Advertisement