एक्स्प्लोर
सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी
सोलापूर : सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी विराजमान झाल्या आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांवर मात करत 28 मतांनी भाजपचा विजय झाला, तर सोलापूरच्या उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल यांची निवड झाली आहे.
102 सदस्य असलेल्या सोलापूर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानावेळी भाजपला 49 मतं मिळाली. शिवसेनेला 21, तर काँग्रेसला 18 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं.
मतदानाच्या वेळी बसप, माकप आणि एमआयएमचे एकूण 14 नगरसेवक तटस्थ राहिले. महापौरपदाच्या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली होती. एमआयएमतर्फे नूतन गायकवाड यांनी अर्ज भरला होता. त्यानंतर भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार महापौरपदाच्या शर्यतीत राहिले होते.
उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल विराजमान झाल्या आहेत. बत्तुल यांना 49, तर उपमहापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवसेनेच्या अमोल शिंदेंना 21 आणि राष्ट्रवादीच्या किसन जाधव यांना 18 मतं मिळाली होती.
सोलापूर महापालिका
- भाजप - 49
- शिवसेना - 21
- काँग्रेस - 14
- राष्ट्रवादी - 4
- मनसे - 0
- एमआयएम - 9
- बसप - 4
- माकप - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
Advertisement