एक्स्प्लोर
Advertisement
प्रवीण महाजनांचा मृत्यू नैसर्गिक नाही : सारंगी महाजन
उस्मानाबादमध्ये पाय ठेवला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी पूनम महाजनांच्या गाडीतून आलेल्या गुंडांनी दिल्याचा दावा सारंगी महाजन यांनी केला.
उस्मानाबाद : भाजपचे नेते प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या करणारा धाकटा भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजप खासदार पूनम महाजन यांचा पीए गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी देतो, असा आरोपही सारंगी यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्क्लुझिव्ह बातचित करताना केला.
उस्मानाबादेतील तपस्वी 29 गुंठ्यांच्या जमिनीवरुन सध्या सारंगी महाजन आणि महाजन कुटुंबीयांमध्ये वाद सुरु आहे. त्याच मुद्द्यावरुन बोलताना सारंगी यांनी गंभीर आरोप केले. उस्मानाबादमध्ये पाय ठेवला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी पूनम महाजनांच्या गाडीतून आलेल्या गुंडांनी दिल्याचा दावा सारंगी यांनी केला.
जमीन मिळवू द्यायची नसल्यामुळे महाजन परिवाराकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 2 ते 3 वेळा धमक्या आल्याचं सारंगी म्हणाल्या. महाजन परिवाराशी आपला काहीही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. पुरावे नसल्यामुळे पोलिसात तक्रार दिली नसल्याचं सारंगी महाजन यांनी स्पष्ट केलं.
प्रवीण यांची प्रतिमा चांगलीच आहे, समोरच्यांनी वाईट केली. मात्र मुलांना हक्क मिळवून द्यायचा आहे, म्हणून हा कायदेशीर लढा देत असल्याचं सारंगी म्हणाल्या.
प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नाही, मानवाधिकारातून यासंदर्भात अहवाल गेला आहे, असा दावाही सारंगी महाजन यांनी केला. त्यांच्या बीपी आणि डायबिटीसच्या गोळ्या बंद केल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचंही सारंगी म्हणाल्या. त्याशिवाय केस जिंकल्यामुळे मेडिकलचे सात लाख रुपये मंत्रालयाकडून मिळालेले नसल्याचंही सारंगी महाजन यांनी सांगितलं.
दरम्यान, सारंगी यांना कोणीही धमकी दिलेली नाही, सहानुभूती मिळवण्यासाठी त्या खोटे आरोप करत असल्याचा दावा प्रवीण महाजन यांचे ज्येष्ठ बंधू प्रकाश महाजन यांनी केला. प्रकाशझोत मिळवण्यासाठी हयात नसलेल्या माणसांवर आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला.
पाहा संपूर्ण व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
रत्नागिरी
नाशिक
Advertisement