एक्स्प्लोर

'या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा...'; खासदार संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन

खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये समोर आली. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.

खासदार संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियामार्फत मराठा तरूणांना हे आव्हान केलं आहे. संभाजीराजे म्हणाले की, 'विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!'

'माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.' , असं आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरूणांना केलं आहे.

पुढे बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, 'एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!'

मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार

मराठा आरक्षण प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उडी घेतली आहे. आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आणि मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं सांगितलं.

मराठा आरक्षणातील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी : विनायक मेटे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही विवेक रहाडेच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. मराठा आरक्षणातील राज्य सरकारच्या नाकर्तेपणमुळे आणखी एक बळी गेल्याचं मेटे म्हणाले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून हा आरोप केला आहे. मेटे यांनी लिहिलं आहे की, "माझ्या बीड जिल्ह्यातील केतुरा या गावचा रहिवाशी असलेल्या मराठा समाजातील विवेक कल्याण रहाडे या १२ वि इयत्ता पास झालेल्या विद्यार्थ्याने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. मराठा समाजाच्या आरक्षण स्थगितीवरील निर्णय माहित झाल्याने काही दिवसांपासून विवेक नैराश्यग्रस्त असल्याचे त्याच्या कुटुंबीयाकडून कळले. रहाडे कुटुंबाच्या दुःखात शिवसंग्राम परिवार सहभागी आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेला आहे. मात्र आत्मबलिदान देणे हा पर्याय नसून समाजातील मुलामुलींनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या इतिहासात आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही तर तिच्यासाठी संघर्षच करावा लागला आहे. छत्रपती शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे आपण एकोप्याने आरक्षणाची लढाई लढू अन पुन्हा जिंकूच मात्र आपल्या जीवाचे बरेवाईट करू नका हि हात जोडून विनंती...."

'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा

बीडमधील विवेक रहाडेची आत्महत्या

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने बुधवारी (30 सप्टेंबर) दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget