Pravin Darekar : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर, काही तुरुंगात तर काही तुरुंगात जाण्याच्या मार्गावर : दरेकर
माझ्यावर जाणूनबुजून सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त किंवा सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली हे काम सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
Pravin Darekar : विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी चोखपणे बजावण्याचे बक्षीस म्हणून सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. माझ्यावर जाणूनबुजून सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त किंवा सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली हे काम चालू आहे. परंतू, कायद्याला हे अभिप्रेत नाही. कायद्यासमोर सगळ्या तपासयंत्रणा समान असतात, तेव्हा कुठल्याही तपासयंत्रणांनी सूडबुद्धीने कारवाई करु नये असेही दरेकर म्हणाले.
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही तुरुंगात आहेत तर काही तुरुंगात जाण्याच्या मार्गावर आहेत. अशात भाजपच्या नेत्यांना अडकवून जशास तसं उत्तर देता येतं का? अशी मानसिकता सरकारची असल्याचे दरेकर म्हणाले. टार्गेट करत आम्हाला त्यांना अडकवायचे आहे. त्यातील एक षडयंत्र माझ्याविरोधात त्यांनी रचले होते असे दरेकर यांनी सांगितले. माझ्यावरचा गुन्हा काय राजा हरिश्चंद्राच्या भूमिकेतून केला आहे काय? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. आपलं ते बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट असे सरकार करत असल्याचे दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यांना खरं काय खोट काय ते समजत आहे. भाजपला पाचपैकी चार राज्यात जनतेनं सत्ता दिली आहे. त्यामुळं वार कोणत्या दिशेला वाहत आहे ते स्पष्ट झाले आहे. निवडणुका ज्यावेळी होतील त्यावेळी महाराष्ट्रात एकट्या भाजपला सत्ता मिळेल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. खर जनतेसमोर आणतो त्यामुळे तुम्ही गुन्हे दाखल करता काय? सत्य परेशान हो सकता है पराजीत नही असेही दरेकर म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच भाजपची भूमिका आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. सुप्रिम कोर्टात ते टिकवलं. पण या महाविकास आघाडी सरकारनं ते घालवलं. ओबीसींच्या बाबतीत भाजपने राज्यभर आंदोलने केली असल्याचे दरेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा : इम्तियाज जलील
- Kirit Somaiya : चला, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूयात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल