रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका, म्हणाले...
Raosaheb Danve : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर मुख्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली आहे.
Raosaheb Danve : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. बिना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालत असते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभेत बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला. मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचे जवाबदार आहेत की बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका केली. बिना मुख्यमंत्र्याचं कुठं राज्य चालत का, या 3 महिन्यात कोण्या शिवसेनेच्या मंत्र्याला चार्ज दिला असता तर राज्याचा राज्यकारभार नीट चालला नसत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. कोरोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे, त्यावर विचारणा केली होती. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी कोरोना काळात मोफत अन्न धान्य द्यावे अशी सूचना केली असल्याचे दानवे यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी असेही मोदी यांनी म्हटले होते, असेही दानवे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्राला आजारी मुख्यमंत्री लाभले, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- फक्त 50 कोटी द्या, मी घरदारासह सगळं तुमच्या नावावर करून जिल्हा सोडतो : सुरेश धस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha