एक्स्प्लोर

Narayan Rane Criticizes Uddhav Thackeray: महाराष्ट्राला आजारी मुख्यमंत्री लाभले, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Narayan Rane Criticizes Uddhav Thackeray: विरोधकांनी गेल्या अडीच वर्षांत एक तरी चांगलं काम केलं तर सांगा, नारायण राणेंचा टोला

Narayan Rane Criticizes Uddhav Thackeray: कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. याचपार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्राला आजारी मुख्यमंत्री लाभले, नामदारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको. त्यांनी राज्याला 10 वर्ष मागे नेलंय, अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. 

"कुडाळच्या जनतेला सुखाने, आनंदाने जगण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. विरोधकांनी गेल्या अडीच वर्षांत एक तरी चांगलं काम केलं तर सांगा. विरोधक भाषणावर विकासावर बोलत नाही. नारायण राणे आणि कुटुंबियांवर टीका करीत आहेत. मत मागायचा मला अधिकार आहे. कारण माझ्या कुडाळ मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी काम केलं. त्यामुळं मला मत मागायचा अधिकार आहे. लोकांची सेवा करत आहोत", असं नारायण राणे यांनी म्हटलंय.  

" जिल्ह्यातील 400 शिक्षक, मेडीकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज मी आणले. तुम्ही एक तरी बालवाडी काढली. खासदार रात्रीचा दिसत नाही. शिवसेना खोटं बोलतेय आणि उद्धव ठाकरे गप्प बसतायेत. चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी आणि सुरेश प्रभू यांनी केलं. याविरोधात शिवसेनेनं त्यावेळी आंदोलन केलं. 2014 साली विमानतळ बांधून पूर्ण केलं. मात्र, सुरू करायला किती वर्षे गेली पहा. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, मी केंद्रात मंत्री झालो. त्यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची खासदार विनायक राऊत यांनी 7 तारीख जाहीर केली. मी हवाई मंत्री जोतीरादित्य सिंधियाना भेटून 9 ऑक्टोबरला जाहीर केली. विमानतळ सुरू केलं म्हणून खासदार विनायक राऊत विमानात पेढे वाटत होते. उद्धव ठाकरे बार भरून उभे होते. मला पाहून म्हणाले आज भांड फोडणार का विचारलं? मी म्हटलं स्टेजवर फोडणार. मी भाषण सुरू केलं. हे विमानतळ सुरू कोणी केलं ते स्टेजवर जाहीर सांगितलं. हे विमानतळ नको म्हणून विनायक राऊत आंदोलन करतायेत, त्यावेळी त्यांची बेईजत काढली आणि बसलो, असंही राणे म्हणाले आहेत. 

पुढे राणे म्हणाले की,  "सी वर्ड साठी 100 कोटी मी आणले. मात्र ते पैसे खर्च केलं आणि सी वर्ड रद्द केला. सिंधुदुर्ग किल्यावर रोषणाई करायचं ठरवलं सिंगापूरप्रणानं आणि अमेरिकेप्रमाणे डीझनी मालवणला जागा राखून ठेवली. मात्र, हे आले आणि रद्द केलं. या सरकारनं मोठे प्रोजेक्ट रद्द केले. माझं आयुष्य जेवढ आहे तेवढ जगणार, धमक्या आम्हाला देऊ नका. धमक्या द्यायला रक लागते. विरोधक माझं काही करू शकत नाहीत. शिवसेना कुठे आहे का चिवसेना आहे.  चिपी विमानतळावरून कुडाळ ला येताना गाडीत बसलो की होडीत बसलो समजत नाही. मुंबईतुन विमानानं येताना न हलत येतो. मात्र, पुढे जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय. मला व्हॅल्यू ऍडेड प्रोजेक्ट पाहिजेत. म्हणून पदभार स्वीकारला आणि लगेच काम सुरू केलं. उद्योगमय सिंधुदुर्ग जिल्हा करणार. जिल्ह्यातील लोकांनी व्यवसाय करावा असं वाटत. विरोधात सत्ता मिळत नसल्याने माझ्यावर टीका करतात." 

एवढ्या महिन्यात केंद्रातील मंत्री मित्र झालेत. संचयनी संदर्भात येत्या काही दिवसांत केंद्रातून लवकरच निकाली लावणार. खासदार विनायक राऊतांचा मुलगा रेडी पोर्ट मध्ये महिन्याच्या सुरवातीला हप्तेखोरीसाठी उभा असतो. जगाच्या पाठीवर आमच्या पंतप्रधानांच नाव आहे. देशाला आत्मनिर्भर बनवणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतायेत. आम्ही मताची भीक मागायची गरज नाही, आम्ही मताचा मोबदलला मागू. आम्हाला सेवा करायची, विकास करायची आहे म्हणून आम्हाला सत्ता द्या. मोदींनी केलेली काम लोकांपर्यंत घेऊन जा, मतदारांसमोर विनम्र व्हा, मत मागा लोक मत देतील. कुडाळ मध्ये 13 पैकी 13 नगरसेवक निवडणून आले पाहिजेत, राणे म्हणाले.  

कुडाळ नगरपंचायत मध्ये आमच्या समोर लगानची टीम आहे. आमची टीम चांगली आहे. आज राजकारणी म्हणून बोललो नाही. तुमच्या घरातील एक व्यक्ती आहे म्हणून बोललो. तुमचे माझे जे संबंध आहेत ते दादा म्हणून हाक मारत म्हणून तुमच्या भावना दुखवू शकत नाही. विरोधकांच्या चेहऱ्यावर जेवढे खड्डे आहेत, तेवढे जिल्ह्यातील रस्त्यावर खड्डे आहेत. मुख्यमंत्री आजारी आहेत, घरी आहेत. राज्याला मुख्यमंत्री हवा तसा मिळाला नाही हा नामदारी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Embed widget