एक्स्प्लोर

शिवसेनेसाठी भाजपची दारं खुली होती आणि राहतील : चंद्रकांत पाटील

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना सोबत येण्याबाबात आपण आशावादी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तर्क-वितर्कतांना उधाण आलं आहे.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला साद घातली आहे. शिवसेनेसाठी आधीही दारं उघडी होती आणि पुढेही राहतील, असं मोठं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय. भाजप शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. शिवसेना आणि भाजपचं रक्त हिंदुत्वाचं आहे. त्यामुळे आपण आशावादी असल्याचं पाटील म्हणालेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केलं होतं. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना सोबत येण्याबाबात आपण आशावादी असल्याचं म्हटलं आहे. उद्या गोपिनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही हजेरी लावणार आहेत. एकनाथ खडसे आणि इतर नेत्यांनी तिथे जाणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणीच पक्षातून जायचा मुद्दा नाही. पंकजा मुंडे या लहानपासून भाजपच्या सर्व कार्यक्रमात हजेरी लावत आहे. त्यामुळे राजकारणात त्या नवख्या नाहीत. या सगळ्या बातम्यांचा त्यांच्या मनाला त्रास होत आहे. ते उद्या त्या स्पष्ट करतील. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पाठ फिरवल्यानं त्या नाराज आहेत का? याविषयी विचारल असता चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे आजारी होत्या आणि त्यामुळे त्या बैठकीस उपस्थित नव्हत्या. याविषयी त्यांनी पूर्वकल्पना दिली होती. Pankaja Munde | मला जे काही बोलायचं आहे, ते उद्या बोलेन : पंकजा मुंडे | ABP Majha गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी परळीत पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, या मेळाव्याच्या पोस्टरमधून कमळ हद्दपार झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान उद्याच्या मेळाव्याला स्वाभिमान मेळावा असं नाव देण्यात आलं आहे. या स्वाभिमान मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन

धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास

मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलनMVA Seat Sharing : मविआच्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यताRamdas Kadam on MVA Seat Sharing : काहीच तासात मविआ तुटणार! रामदास कदमांचा मोठा दावाABP Majha Headlines : 06 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 

वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना

मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव

Embed widget