एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातला सौर उर्जेचा सर्वात मोठा प्रकल्प कार्यान्वित
कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी या शेतकऱ्यांच्या बहुचर्चित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी ही त्यापैकी प्रमुख योजना आहे.
नाशिक : कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी या शेतकऱ्यांच्या बहुचर्चित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी या योजनेअंर्तगत राज्यातील सर्वात मोठा 1.3 मेगावॅटचा सौर प्रकल्प नाशिक जिल्हयातील लासलगाव येथे सुरु झाला आहे.
राज्यात महावितरणकडून वितरीत होणाऱ्या एकूण वीज वापरापैकी सर्वात जास्त 30 टक्के वीज ही कृषीपंपांसाठी वापरली जाते. सध्या कृषीपंपाना चक्राकार पध्दतीने दिवसा आठ तर रात्री दहा तास वीज पुरवठा केला जातो. दिवसा अधिक वीज उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते.
कृषी पंपांचा सर्वाधिक वापर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने असे सौर प्रकल्प उभे केले जात असून, लासलगाव महावितरणच्या उपकेंद्रात 20 हजार चौरस मीटरच्या जागेवर 1.3 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प स्वमालकीच्या जागेवर उभारण्यात आला आहे.
लासलगावमध्ये उभारण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातला सर्वात मोठा सौरउर्जा प्रकल्प ठरला आहे. या सौर ऊर्जेच्या माध्यमातून लासलगाव आणि मरळगोई या दोन उपकेंद्रातील आठ ते दहा गावांना त्याचा फायदा होणार आहे. दिवसाला साडेपाच हजार मेगावॅट वीजेची या ठिकाणी निर्मिती होत असल्याने अनेक गावांना आता अखंड वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता अखंडीत वीज पुरवठा होणार असल्याने अडचणी दूर झाल्याचे शेतकरी सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement