एक्स्प्लोर

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

नाशिक पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

Gondia News गोंदिया : नाशिकमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले (Nana Mahale) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजविण्यासाठी बारामती (Baramati) येथील गोविंदबागेत आज पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का बसला आहे.

सकाळचे हे प्रकरण ताजे असतानाच विदर्भातील महत्त्वाचा आणि खासदार प्रफुल्ल पटेलांचा (Praful Patel) गृहजिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी आणि प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लांजेवार यांचा  पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय.

नाशिक पाठोपाठ गोंदियात देखील राष्ट्रवादी पक्षाला धक्का 

महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधनीला सुरुवात केलेली आहे. अशातच प्रफुल पटेल यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले  जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या जवळपास हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला असून हा प्रफुल पटेल यांना मोठा धक्का समजला जात आहे.

अजय लांजेवार यांनी वंचित कडून 2019 मधे मोरगाव अर्जुनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी 25,000 इतके मतं पडली होती. दरम्यान स्थानिक पातळीवर त्यांची पकड असल्याने त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का समजला जातो आहे.

नवीन नाशिकचे शेकडो पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश 

दुसरीकडे नाशिक शहरातील माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा, सिडको, नवीन नाशिकच्या शेकडो प्रमुख पदाधिकारीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget