एक्स्प्लोर
मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त
![मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त Bhiwandi 60 Lakhs Seized Before Voting Latest News Update मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/23150657/Bhiwandi_Cash_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंड : भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (24 मे) मतदान होणार असताना आज एका खाजगी गाडीतून तब्बल 60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड ठाण्यातून भिवंडीत नेली जात होती.
भिवंडी बायपासजवळील साईबाबा नाका चेकपोस्ट इथे पोलिस आणि महापालिकेच्या आचारसंहिता पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
महापालिका निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना मतदारांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि निवडणूक आचारसंहिता पथकांनी देखरेख अधिक कडक केली आहे.
त्यातच साईबाबा नका चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी सुरु असताना एमएच 04 ईटी 1508 क्रमांकाच्या एका पांढऱ्या तवेरा गाडीतून तब्बल ६० लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. ही रोकड महाराष्ट्र ग्रामीण बँकेची असल्याचा दावा करण्यात आला. मात्र गाडीत असलेल्या इसामांपैकी कुणाकडेही याबाबतची पुरेशी कागदपत्रं आढळली नाहीत.
त्यामुळे या सर्वांना शांतीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आलं असून रोकडही जप्त करण्यात आली आहे. ही रोकड नेमकी कुणाची आहे आणि कशासाठी आणली जात होती, याचा सध्या तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)