एक्स्प्लोर

Bhide Wada : सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक कसं असेल?; छगन भुजबळ म्हणाले..

भिडेवाड्यातील सावित्रीबाई फुलेचं राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा (Bhide wada) येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच सावित्रीबाईंच्या काळातील जसं असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती 'सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा' अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर,  क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग या बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची  व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना आणि आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे भुजबळ म्हणाले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही भुजबळ म्हणाले.

भरपूर प्रयत्नानंतर भिडे वाड्याचं अतिक्रमण हटवलं!

2008 साली हा वाडा पाडून इथं स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मात्र काळाच्या ओघात इथं भाडेकरू म्हणून दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांनी इथून हटण्यास नकार दिला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मध्यरात्री इथली अतिक्रमणं काढण्यात आली आणि जिरणावस्थेत असलेले या वाड्याचे अवशेष पाडण्यात आले.  भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्त्री शिक्षणाची जिथून सुरुवात झाली त्या भिडे वाड्याचा इतिहास आता पुन्हा जिवंत होणार आहे. 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाईंनी जोतिबा फुलेंच्या साहाय्याने मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात केली. चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या मुली शिकायला लागल्या आणि आणि देशात एका क्रांतीला सुरुवात झाली. 

इतर महत्वाची बातमी-

'जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिलीय का?' खासदार संजय राऊतांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget