(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिलीय का?' खासदार संजय राऊतांचा सवाल
देशातील एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. तुम्हाला हवं त्या राज्यात, मतदारसंघात निवडणूक घेऊन दाखवा मग जनता त्या निकालावर विश्वास ठेवेल, असे आव्हान संजय राऊतांनी सरकारला दिले आहे.
सोलापूर : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची ताकद जेव्हा मिळेल तेव्हा विजयाचा मार्ग मोकळा होतो, असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोलापुरात (Solapur News) केले आहे. दरम्यान जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी मंत्री छगन भुजबळांना फडणवीसांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिलीय का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. देश वाचवण्यासाठीच्या लढाईत प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर असतील, असेही राऊत या वेळी म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, मोदींचा पराभव झाल्याशिवाय संविधान रक्षण होणार नाही हे त्याना माहिती आहे. 2024 ला सोलापूरचं चित्र पूर्णपणे बदलाणार आहे. देश वाचवण्यासाठीच्या लढाईत प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर असणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांची ताकद जेव्हा मिळेल तेव्हा विजयाचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे सोलापूरचे राजकारण देखील तुम्हाला 2024 ला पूर्ण बदलले दिसेल. भाजपची पाटी पूर्णपणे कोरी झालेली असणार आहे.
मोदी शहा संपून जातील पण शिवसेना संपणार नाही : संजय राऊत
मागच्या दहा वर्षासारखे घाणेरडे राजकारण आम्ही कधीचं पहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांचीचं होती, आणि त्यांचीच राहिलं. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न मागच्या 60 वर्षात अनेक वेळा झाले पण शिवसेना कधीच संपणार नाही. देशाच्या इतिहासात मोदी शहा संपून जातील पण शिवसेना संपणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
देशातील एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, संजय राऊतांचे आव्हान
तेलंगणात केसीआरचा पराभव करणे हा सर्वात मोठा टास्क होता. काँग्रेसने ते केले आहे. केसीआर हे त्या राज्याचे निर्माते होते पण ते मोदी शाह करू शकले नाही, भाजपला केवळ 10 जागा मिळाल्या आहेत. राजस्थानमध्ये प्रत्येक वेळी जनता शासन बदलते. मध्यप्रदेशचा निकाल हा आश्चर्यकारक आहे.पोस्टल बॅलेटवरचा ट्रेंड वेगळा आहे आणि evm वरचे निकाल वेगळे आहेत. या देशातील एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. तुम्हाला हवं त्या राज्यात, मतदारसंघात निवडणूक घेऊन दाखवा मग जनता त्या निकालावर विश्वास ठेवेल. जगभरात evm रद्द झाले आहे, बांगलादेशमध्ये देखील विरोधीपक्षाने विरोध केला. बांगलादेशला evm आपणच पुरवठा करतोय. 27 वेळा आम्ही आयोगाकडे बॅलेटची मागणी केलीय. जो पर्यंत मोदी शाह आहेत तो पर्यंत हे कधीच मान्य होणार नाही, असे देखील संजय राऊत या वेळी म्हणाला.
भाजप जातीजातीत भांडण लावत आहे : संजय राऊत
ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यात कधीच नव्हता पण हे सध्या सुरु आहे. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे जे कोणी दुर्बल आहेत त्याना आरक्षण दिलं पाहिजे. मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युद्ध थांबवतात पण महाराष्ट्रच्या प्रश्नावर त्यांची भूमिका आलेली नाही. हिंदू मुस्लिम वाद आता चालणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता जातीजातीत भांडण लावले जात आहे. जरांगे पाटील यांच्याविरुद्ध भुजबळ यांना फडणवीस यांनी पॉवर ऑफ अॅटरणी दिली आहे असे वाटत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, दुसऱ्याच्या ताटातील न हिसकावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे.
हे ही वाचा :