एक्स्प्लोर

Exit Poll Results 2024 : एक्झिट पोल म्हणजे भाजपचा सायकॉलॉजीकल वारफेअर; मविआचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळेंची टीका

शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी संपताच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. मात्र, हा एक्झिट पोल म्हणजे भाजपचा सायकॉलॉजीकल वारफेअर असल्याची टीका काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली आहे.

Bhandara Gondia Loksabha : अठराव्या लोकसभा निवडणुकांची शनिवारी सांगता झाली आहे. देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी काल संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP Cvoter Exit Poll) पोलमध्ये समोर आले आहे. तर एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे.

तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे (Prashant Padole)  यांनी भाजपवर सडकून टीका करत हा एक्झिट पोल म्हणजे भाजपचा (BJP) सायकॉलॉजीकल वारफेअर असल्याचे म्हटले आहे. सोबतच आपल्या विजयाची खात्री दर्शवत 5 जून रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वाढदिवसानिमित्य महाराष्ट्र विजयाचं विषेश गिफ्ट देणार असल्याचा दावाही केला आहे. ते भंडारा येथे बोलत होते.

एक्झिट पोल नसून भाजपचा सायकॉलॉजीकल वारफेअर  

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक्झिट पोल समोर आला आहे. मात्र हा एक्झिट पोल जनतेचा नसून तो भाजप सरकारचा आहे. भाजप निवडणुका साम, दाम, दंडभेद ने  लढत असते. हा एक्झिट पोल नसून भाजपचा सायकॉलॉजीकल वारफेअर असल्याचे मत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक मतदान मोजणी दरम्यान कार्यकर्ते, मतदान मोजणी प्रतिनिधी कसे डिप्रेशनमध्ये जावेत आणि ते डिप्रेशन मध्ये गेल्यावर मतमोजणी दरम्यान कसं लक्ष विचलित व्हावं, याचा प्रयत्न भाजप करत आहे. हा सत्ता परिवर्तन करण्याचा भाजपचा घाट आहे. 

नाना पटोले हे मुख्यमंत्री  होतील-डॉ. प्रशांत पडोळे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सगळे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी निवडणुकीत मेहनत घेतली आहे. मागील दहा वर्षात भाजपच्या तानाशाही सरकारनं देशात कुठलेच प्रश्न सोडविले नाहीत. बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. पाच जूनला नाना पटोले यांचा वाढदिवस असून भंडारासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि नाना पटोले यांना  एक वेगळं वाढदिवसाचं गिफ्ट देतील. असा विश्वासही डॉ. प्रशांत पडोळे यांनी बोलताना व्यक्त केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सरकार येईल आणि नाना पटोले हे मुख्यमंत्री बनतील असा मोठा दावाही भंडारा गोंदिया लोकसभाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी एबीपी माझा शी बोलताना व्यक्त केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget