IND vs AUS 2nd T20 Weather Forecast : भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना होणार रद्द? मेलबर्नमधून धडकी भरवणारी अपडेट
IND vs AUS 2nd T20I Match Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) वर खेळवला जाणार आहे.

IND vs AUS 2nd T20I Match Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) वर खेळवला जाणार आहे. कॅनबेरामधील पहिला सामना पावसामुळे अर्धवट राहिल्यानंतर आता मेलबर्नमध्येही हवामान अडथळा ठरू शकते, अशी शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार शुक्रवारी मेलबर्नमध्ये दिवसभर पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे सामना पुन्हा एकदा प्रभावित होऊ शकतो.
🎥 𝘼𝙪𝙨𝙩𝙧𝙖𝙡𝙞𝙖𝙣 𝙏𝙧𝙖𝙫𝙚𝙡 𝘿𝙞𝙖𝙧𝙞𝙚𝙨#TeamIndia reach Melbourne for 2nd #AUSvIND T20I 🛬 👌 pic.twitter.com/MIadTIuEWz
— BCCI (@BCCI) October 30, 2025
मेलबर्नमध्ये कसे आहे हवामान? (IND vs AUS 2nd T20I Match Weather Forecast)
पहिल्या टी-20 सामन्यात भारताने तुफानी सुरुवात केली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी आक्रमक फलंदाजी केली, पण 9.4 षटकांनंतर पावसाने सामना थांबवला. आता चाहत्यांना मेलबर्नमध्ये पूर्ण सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा असली तरी अॅक्यूवेदरचा (AccuWeather) अंदाज काहीसा निराशाजनक आहे.
रिपोर्टनुसार, 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये 87% पावसाची शक्यता आहे. आकाश दिवसभर ढगाळ राहील आणि 17% शक्यता वीजांसह हलक्या सरींचीही आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे, सामन्याच्या वेळेत 70% पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे, ज्यामुळे सुमारे 1.4 मिमी पाऊस पडू शकतो.
मेलबर्नमधील खेळपट्टी कशी असेल? (India vs Australia 2nd T20I Melbourne Pitch Report)
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील खेळपट्टी पारंपरिकपणे गोलंदाजांना थोडी मदत करते. मोठे मैदान असल्याने फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे नसते. तरीही अलीकडच्या बिग बॅश लीग (BBL) सामन्यांत येथे मोठे धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिस यानेही सांगितले की, सध्याच्या MCG पिचवर फलंदाजी काहीशी सुलभ झाली आहे. मात्र ढगाळ वातावरणात गोलंदाजांना स्विंग मिळू शकते, त्यामुळे दोन्ही संघ रणनीती आखताना हवामान आणि पिच या दोन्ही गोष्टींचा विचार करतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरा सामना कुठे आणि कधी पाहू शकता?
- दिनांक : शुक्रवार, 31 ऑक्टोबर
- स्थळ : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG)
- वेळ : भारतीय वेळेनुसार वेळ दुपारी 1:45 वाजता
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- ऑनलाइन स्ट्रिमिंग : जिओहॉटस्टार अॅपवर उपलब्ध
हे ही वाचा -





















