Bhandara : अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीवरुन जाणाऱ्या वहिनी- नणंदेचा मृत्यू
Bhandara: भंडारा जिल्ह्यात पाण्यात अज्ञात वाहनाने स्कूटीला दिलेल्या धडकेत वहिनी आणि नणंदेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
![Bhandara : अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीवरुन जाणाऱ्या वहिनी- नणंदेचा मृत्यू Bhandara two women dies after being hit by an unidentified vehicle Bhandara : अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीवरुन जाणाऱ्या वहिनी- नणंदेचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/02/660419e32dc7091a23b211fd77f23611_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhandara: भंडारा जिल्ह्यात पाण्यात अज्ञात वाहनाने स्कूटीला दिलेल्या धडकेत वहिनी आणि नणंदेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातिल मोहघाट जंगल परिसरातत घडली आहे. सुरुची रवींद्र मल्लेवार (वय 36 वर्षे) मृतक वहिनीचे नाव असून सोनाली आंगीडवार (वय 28 वर्षे) नणंदेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुची आणि सोनाली या आपल्या स्कूटीने घुटसावरी वरून साकोलीकडे येताना अज्ञात वाहनानी धडक दिली. स्कूटीला धडक दिल्यानंतर हा अज्ञात वाहनचालक पसार झाला आहे. सुरूची मल्लेवार यांचा पूर्णपणे खांदा तुटला आणि दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला. तर सोनाली संगीडवार यांच्या दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला असून त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले होते.
सुरुचि मलेवार यांच्या प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान सुरुची यांच्या भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. सोनाली आंगीडवार यांच्या साकोली येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. साकोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अज्ञात वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Missing School Bus : "उद्या दुपारपर्यंत झालेल्या निष्काळजीसंदर्भात खुलासा करा" , पोदार शाळेच्या व्यवस्थापनाला शिक्षण उपसंचालकांचे आदेश
- गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
- हिंगोलीच्या वसमतमध्ये हळद प्रक्रिया उद्योग उभारला जाणार, शंभर कोटींचा निधी मंजूर
- माझ्या नवऱ्याची एक भानगड काढून दाखवा, मी तुमच्या शंभर भानगडी काढेन; चित्रा वाघ यांचे सतेज पाटलांना आव्हान
- राज ठाकरे हे सिझनेबल कार्यक्रम, कोणत्याही ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही; गुलाबराव पाटलांची बोचरी टीका
-
एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, 19 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)